पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन काटोल:- ज्या नगरपालिकेचे तरुण बेरीजगरसाठी रोजगराची निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. त्या काटोल नगरपालिकेने तरुणाला रोजगार उपलब्ध करून न देता त्यांनी स्थापन केलेल्या रोजगाराचा टप्परी वर अतिक्रमणाची कारवाई करत बेरोजगार केल्याने गुलाब ताकतोडे यांनी भरउन्हात काटोल नगरपरिषद समोर नग्न आंदोलन सुरू केल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
नगरपरिषद काटोलचे मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक राग व आकस मनात ठेवून गुलाब ताकतोडे यांच्या दुकानावर अतिक्रमणाची कारवाई केली, एकीकडे संपूर्ण काटोल शहरात मोठमोठ्या व्यापारी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, यांचे रीतसर अतिक्रमण असून सुद्धा कोणतीही कारवाई त्यांनी केली नाही, परंतु एक सामान्य घरचा मातंग समाजाचा उच्चशिक्षित मुलगा तो नंबर शाळेच्या पाठीमागे रहदारीला कोणताही त्रास होऊ न देता त्या ठिकाणी ठेला लावून नेट कॅफेचे दुकान चालवत होता परंतु वैयक्तिक राग मनात ठेवून, आकसापोटी गुलाब ताकतोडे याच्यावर अतिक्रमणाची कारवाई केल्याने गरीब बेरोजगार तरुणांवर अतिक्रमणाची कारवाई श्रीमंतासाठी नाही काय अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे पन्नालाल जमनादास कापड लाईन मध्ये पैदल चालता येत नाही. अशाप्रकारे अतिक्रमण असते, या नगरपरिषद समोरील चौपाटीवर हे युपी बिहारचे भैय्या लोक यातील अतिक्रमण करून धंदे करत आहे. त्याच बरोबर तिथे अवैध धंदे पण खूप जोमात चालतात, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न करता, काटोलातील गरीब मुलांना ती जागा धंद्यासाठी न देता, हे बाहेरचे युपी बिहार चे लोक काटोल शहरातील लोकांचा रोजगार हिरावून मोक्याच्या जागा मठारल्या आहे हे नगर परिषद मुख्याधिकारी दिसत नाही का? अशा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे.
एकीकडे काटोलात बेरोजगारीचा प्रश्न एरणीवर असून रोजगारासाठी धडपडणाऱ्या या गुलाब सारख्या मुलांना जर न्याय मिळत नसेल तर काटोलातील युवांनी करावे काय हा प्रश्न आता येऊन पडला आहे.