विठ्ठल ठोंबरे, शिर्डी /राहाता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहाता:- तालुक्यातील धनगरवाडी गावात राहणाऱ्या भगवान गंगाधर राशीनकर यांच्या दुचाकी मोटर सायकल गाडीला (गाडी नं महा.१६ ए.एम.१६५३) राहाता विरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस भाजीमार्केट जवळ राहाता साकुरी रोडवर पोलीसांची गाडी नं महा.१६ ए.टी ६८६२ या चार चाकी गाडीमुळे अपघात झाला आहे.
हा अपघात त्या ठिकाणच्या लोकांच्या माहितीनुसार पोलीस विभागामध्ये कार्यरत कल्याण काळे यांच्या गाडीमुळे सदर अपघात झाला आहे. त्यांना तातडीने उपचारा साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान गंगाधर राशीनकर यांचा मृत्यू झाला. राहाता पोलिसांनी संपूर्ण झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पोलीस विभागांत कार्यरत असलेले कल्याण काळे यांच्या झालेल्या चुकीचा पोलीस तपास करणार का? कल्याण काळे यांची चौकशी करुन पुढील कार्यवाही करणार का? असे प्रश्न वाकडी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विचारण्यात येत आहे. तसेच सर्व धनगर समाज व नागरिकांचे या विषयाकडे लक्ष लागले आहे.
पोलीस उपअधिक्षक या अपघात झालेल्या व्यक्तीला व राशीनकर परिवाराला न्याय मिळवून देणार का? पोलीस घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करुन कल्याण काळे यांच्यावर कार्यवाहीचे आदेश काढणार का? किं त्यांना पाठीशी घालत वाचवण्याचा प्रयत्न करणार या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहाता पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार धिरज अभंग, पोलीस निरीक्षक सोपान काकड,पोलीस कर्मचारी चौधरी यांनी नोंदवलेल्या तक्रारीवर चौकशी का केली नाही, पोलीस स्टेशनला आलेल्या प्रत्यक्षदर्शिना का धमकावण्यात आले तसेच या घटनेला वेगळी दिशा देत पुरावे मिटविण्याचे काम का केले. यासर्व घटनेची सविस्तर माहिती पोलीस उपअधिक्षक शिरीष वामने शिर्डी यांना दिली आहे. झालेल्या या सर्व घटनेची सत्य परिस्थिती समोर मांडली आहे तरी योग्य ती कारवाही करण्यात यावी.
पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक या कुटुंबाला लवकरात लवकरच न्याय मिळवून देतील असं त्यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे. म्हणून सर्वांचे लक्ष आता या घटनेकडे लागले आहे.