युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 6 डिसेंबर 2019 रोजी संपूर्ण नागपुर जिल्हात संताप व्यक्त करणारी घटना समोर आली होती. एका 5 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घूणपने हत्या करणाऱ्या नराधमाला आरोपीला नागपुर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिहेरी फाशी शिक्षेसह, 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय देव पुरी रा. लिंगा, ता. कळमेश्वर असे या नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपीला तिहेरी फाशी दिली जाण्याची नागपुर जिल्हातील ही पहिलीच घटना आहे. न्यायाधीश एस. आर. पडवळ यांनी हा निर्णय दिला.
कळमेश्वर येथील लिंगा शिवारातील शेतात 8 डिसेंबर 2019 रोजी 5 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. तर, घटना 6 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 5.00 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावात मुलीच्या आईचे पालकही राहात असत. ही मुलगी कधी-कधी तिच्या आजीकडे खेळायला व झोपायला जात असे. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास ही मुलगी घरून निघाली. मात्र, रात्री उशिरा पर्यंत घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी तिची आई सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास आपल्या आईकडे मुलीला घ्यायला गेली. परंतु, मुलगी आदल्या दिवशी तेथे आली नसल्याचे समजले. त्यानंतर शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
त्यानंतर 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नागरिकांना गावातील एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडात कापडाचा बोळा व काड्या कोंबलेल्या होत्या. तर, दगडाने ठेचून तिची हत्या झाली होती. हे शेत नागपुरातील रहिवासी संजय भारती यांचे होते. आरोपी संजय पुरी याच शेतात गडी होता. न्यायालयाने एकूण 26 साक्षीदार तपासत आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणी विशेष सरकारी म्हणून वकील म्हणून ॲड. प्रशांत सत्यनाथन यांची नियुक्ती झाली होती. तर, आरोपीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ॲड. एस. एम. काझी व हेमंत झा वकील म्हणून उपलब्ध करण्यात आले होते.
या तीन कायद्यात फाशी: नराधम आरोपी संजय याच्या वर अपहरण, हत्या, अत्याचार आणि बाल लैगिक कायदा (पोक्सो) अशा विविध कलमां. नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने हत्या (कलम 302), अत्याचार (376 अ, ब) आणि पोक्सो (कलम 6) अशा तीन कायद्यान्वये नराधम संजयला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच, अपहरण केल्याने सात वर्षे कारावास, पोक्सो कलम 4 मध्ये सहा महिने कारावास व दहा हजार दंड आणि पोक्सो कलम दहा मध्ये सात वर्षे कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली. त्यासाठी न्यायालयाने एकूण 26 साक्षीदार तपासले.