अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर चालत असून सुध्दा याकडे लक्ष का दिले जात नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या पोटी दुर्लक्ष करतात की इतर काही. मात्र दरवर्षी लाखोंचा महसूल बुडत असताना देखील असे का होते हा प्रश्न निर्माण होत आहे.
तालुक्यातील “रेती घाटाचीच” अक्षरश: चोरी होत असल्याने शासकीय कर्मचारी रेती माफियांच्या वेसणीला बांधलेले आहेत का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोर-चोर भाऊ भाऊ वाटून खाऊ या संकल्पेतुन रेती तस्करी कारभार चालला असून लाखो रुपयांच्या महसुलाचे भागीदार आहेत तरी किती हा संशोधनाचा विषय आहे.
जेव्हा अवैध रेती तस्करीच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या त्यानंतर स्थानिक पोलीस विभागाने आयपीएस पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या नेतृत्वात जोरदार कारवाई सुरू केली. तेव्हा महसूल विभागाला झोपेतून जाग आली की अमरावती यवतमाळ येथील रेती तस्कर रेतीचा उत्खनन करून तस्करी करत आहे. त्यानंतर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
तालुक्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत साती घाटाचा लीलाव झालेला नाही. मात्र या घाटावरून रेती माफिया खुलेआम व राजरोसपने अवैद्ध रेतीची वाहतूक भर दिवसा व रात्रीला करीत होते. या अगोदर सुद्धा पोलिसांनी व महसूल विभागाने अनेकदा कारवाई केली. पण परिस्थितीत फरक पडला नाही. शेवटी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्या नेतृत्वात साती घाटावर मध्य रात्रीला रेड करून मोठी कारवाई करण्यात आली. साती घाट येथे पोलीस आणि महसूल च्या संयुक्त कारवाईत 23 टिप्पर, 2 पोकलंड आणि 3 बोट जप्त करण्यात आल्या.
सदर कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मसाळ व ठानेदार प्रफूल डाडूले आणि महसूल टीम व पोलिसांच्या उपस्थितीमध्ये करण्यात करण्यात आली. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.