उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातील अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंतच्या ‘बोलका रस्ता’चे लोकार्पण काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेमार्फत ‘बोलका रस्ता’ अंतर्गत परिसराचे सौदर्गीकरण करण्यात आले असून, त्यामध्ये शहरातील महत्त्वाच्या वास्तूंसह गरुड, बगळे आदी पक्ष्यांचे शिल्प आणि कारंजे निर्माण करण्यात आले आहेत. तसेच वृक्ष संवर्धनाच्या प्रतिकृती आणि निसर्ग सौंदर्याचे देखावे साकारण्यात आले आहे.
परंतु लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आलेल्या बोलक्या रस्त्यावरील अकोल्यातील सौदर्याचे देखावे झाकून घेण्यात आले होते. परंतु आचारसंहिता संपली तरीही या बोलक्या रस्त्यावरील सौदर्याचे देखावे झाकून ठेवले आहेत. म्हणून आचारसंहिता संपली हा विसर महानगरपालिका प्रशासन तथा जिल्हा प्रशासनाला पडला असून हा बोलका रस्ता मुका झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांनी बोलक्या रस्त्यावरील सौंदर्यीकरण खुले करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे.