सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- आजच्या आधुनिक काळात हुंडा पद्धत नावाचा राक्षस सर्व दूर पसरले आहे. मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विकराल रूपात आहे. त्यामुळे अनेक महीलाचे जीवन नरकमय झाले आहे. अशीच एक महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर हादरले आहे. सोलापूरच्या सांगोलामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी आरोपी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलीस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत.
संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या सोबत डॉक्टर ऋचा यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत. लग्नानंतर डॉक्टर सुरज हा पत्नी ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देवून पैशाची मागणी करत होता. सुरज हा व्यभिचारी वागणूक करीत असताना आढळून आल्याने ऋचा यांनी त्यांना विचारणा केली होती. तर सुरज त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन बघून घेतो असे सातत्याने धमकावत होते.
माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव
आरोपी डॉक्टर सुरज रूपनर हे एमआरआय मशीन विकत घेण्याकरीता माहेरून पैसे घेऊन ये नाही तर आत्महत्या कर म्हणून सातत्याने ऋचा यांना त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रुपनर यांनी 6 जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानंतर सांगोला पोलीस स्टेशनमध्ये ऋचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर सुरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांचा शोध सुरु आहे. आरोपीला अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर ऋचा यांच्या नातेवाईकांनी केली आहे.