मृतदेह ईल्लूर ठाकरीजवळ आढळला.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत गोंडपिपरी तालुक्यात वैनगंगा नदीत पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून आहे. अशातच दि.१६ शुक्रवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान गोंडपिपरी-आष्टीच्या वैनगंगा नदीपात्रात एक अज्ञात इसम उडी मारत असल्याचे दिसताच नवीन पुलाची निर्मिती करण्यासाठी कामावर असणाऱ्या मजुरांनी अज्ञात इसमाला वाचवण्यासाठी धाव घेतली शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांच्यापर्यन्त पोहचण्याआधीच उडी घेतली. शुक्रवारी दिवसभर उडी घेणारा नेमका कोण चर्चा असताना. गोंडपिपरी येथील एक शिक्षक घरून दाळी करण्यासाठी केस कर्तनालयात सकाळी ९ वाजता गेलेले उशिरा पर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दिली. त्यानंतर गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी आपत्ती व्यवस्थापन पोलीस रेस्क्यू टीमला सोबत घेत शोध मोहीम राबवली असता दि.१७ सायंकाळी पाच च्या दरम्यान आष्टी इल्लूर जवळील ठाकरी गावालगत नदीकाठावर मृतदेह आढळला असून त्यांची ओडख पटली ते बेपत्ता असलेले शिक्षकच होते. मृतक रामचंद्र उराडे वय वय ५६ वर्ष ते जिल्हा परिषद विहरगाव शाळेत कार्यरत होते. आष्टीचे ठाणेदार कुंदन गावडे यांनी मृतदेह पाठवण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.
रामचंद्र उराडे यांच्या पच्यात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा बराच मोठा आवतपरिवर असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे. शिक्षक हे मागील अनेक दिवसापासून मधुमेहाच्या त्रासाने ग्रासले होते त्रास असह्य झाल्याने जीवनयात्रा संपवल्याचा अंदाज बांधल्या जात आहे

