पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी
दि. १५/०९/२०२२ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पो. अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, यश कौडार नावाचा इसम त्याचे जवळ पांढरे रंगाची अॅव्हिएटर चोरीची दुचाकी असून तो मेटल हॉस्पीटलचे ग्राऊंड मध्ये कॉमरझोन जवळ येरवडा, पुणे येथे थांबलेला आहे.
सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी मोउपनि अंकुश डोंबाळे व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्यास पकडले त्याला नाव विचारता यशदीप गोविंद कोंडार वय २४ रा लेन नं २ संजय पार्क कळस विश्रांतवाडी पुणे असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे ताब्यातील दुचाकी बाबत चौकशी करता त्याने पर्णकुटी चौकाजवळील सार्वजनिक मुतारी जवळून चोरल्याचे कबूल केले आहे.. त्याप्रमाणे येरवडा पोलीस स्टेशनकडे नमूद गाडी चोरी झालेबाबत १ येरवडा पो स्टे गुर नं ३५७ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर आरोपीस नमूद गुन्हयामध्ये अटक करून आरोपीकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये तपास करता त्याने
२. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुर नं १४/२०२२ भादवि ३२७९ मधील होंडा अॅक्टीव्हा मोटारसायकल
३. मंचर पो स्टे गुर नं ३३८/२०२२ भादवि ३७९, ३८०, ४५७,५५५ मधील बजाज पल्सर मोटारसायबल
४. मंचर पो स्टे गुर नं ३२३/२०२२ भादवि ४५४४५७,३८० मधील लॅपटॉप
वरिल अशा गुन्हयामध्ये चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर आरोपीकडून एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपीने यापूर्वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड मध्ये 19 गुन्हे केले आहेत. त्याचेकडून गुन्हयातील चोरीची ३ मोटारसायकल व १ लॅपटॉप असा एकूण १,७०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव सहा.पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, व.पो.नि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पो.नि. गुन्हे येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पो.उप निरी. अंकुश डोंबाळे, सपोफौ प्रदिप सुर्वे,पो.अम. गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, अमजद शेख, तुषार खराडे, कैलास डुकरे, किरण घुटे, सागर
जगदाळे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे.

