मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मनुष्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणे कठीण जाते. पण योगासारखा व्यायामाच्या प्रकाराने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आपल्याला सुदृढ राहता येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगाचे महत्व जगाला सांगून 21 जून या दिवसाला जागतिक योग दिन म्हणून मान्यता मिळवून दिली. आपणही नियमित योगा करत त्याचे महत्व समजून घेतले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार अशोक नेते यांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्वत: योगासने केली. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही नियमित योगासने करण्याचे आवाहन त्यांनी केले.