मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- लोकसभा मतदार संघाचे नवंनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसाण यांना विविध समस्ये बाबत सामाजिक कार्यकर्ते मधुकर गोंगले यांनी निवेदन दिले.
यावेळी या निवेदनात म्हटले आहे की, स्वतंत्र्यापासून गडचिरोली जिल्हातिल आजही काही गावे विकासा पासून सोयी सुविधेपासून कोसो दूर आहेत. या परिसरातील जनतेचा प्रश्न मार्गी लावाल म्हणून, अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला) परिसरातील अनेक गावे विकासापासून कोसोदूर आहेत आणि विस्वास करतो की, विविध समस्येचे निराकरण करण्याचा प्रयन्त कराल अशी आशा बाळगतो.
1) राजाराम येथील प्राथमिक आरोग्य पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावे. व रुग्णवहीका उपलब्ध करून विविध रिक्तपदे भरण्यात यावी: राजाराम परिसरात जवळपास 8 ते 9 गावे येत असून काही गावामध्ये पक्के रस्तेसुद्धा नाहीत. राजाराम येते आरोग्य पथक असून या परिसरात अंदाजित लोकसंख्या 8 ते 10हजार इतकी आहे, व या ठिकाणी रुग्णवाहीका सुद्धा नाही.कोरेपल्ली पासून घनदाट जंगलातून,पक्के रस्ता नसून मोठमोठे दगडातून प्रवास गाटावे लागत असतो, व प्रसूती महिला रस्त्यावर दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही,व सद्या पावसाळ्यातले दिवस असून साप, विंचू चावून दगावण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही.
कमलापूर येते आरोग्य केंद्र असून कोरेपल्ली पासून 20 ते 25 किमीचा प्रवास कराव लागत असतो. आणि कोरेपल्ली येते लाखो रुपये खर्च करून दवाखाना बांधकाम करण्यात आले परंतु या ठिकाणी परिचारिका (नर्स) मुख्यालयी राहत नसून 10 ते 15 दिवसातून एकदा किव्हा दोनदा येत असते.
2) राजाराम येते राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना करण्यात यावी: राजाराम येते मध्येस्ती गाव असून जवळपास एकही राष्ट्रीयकृत बँक नसून बँकेत जायचं म्हटलं तर, अहेरी किव्हा आलापल्ली 30 ते 35 किमीचा प्रवास करावा लागतो. एक -एक दिवस वाया जातो, तसेच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास भोगावा करावा लागतो आणि श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे उचलण्याकरीता वृद्ध महिला किव्हा म्हातारे लोकांना खूप अडचणींनां सामोरे जावे लागत असतो. व बँकेत जाऊन लाईनमध्ये राहावे लागत असतो. राजाराम परिसरात खांदला, पत्तीगांव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, कोरेपल्ली, मरनेल्ली, कोंकापल्ली, सूर्यापल्ली, छल्लेवाडा, कमलापूर, रायगट्टा, गोलाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगुडम, तीमरम, इत्यादी गावा लगत एकही बँक नसून राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्यात यावी.
3) राजाराम ग्रामपंचायत कार्यालय असून या ठिकाणी स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी: राजाराम ग्रामपंचायत येते जवळपास 2 ते 3 हजार लोक संख्या असून राजाराम ग्राम पंचायती मध्ये स्वतंत्र ग्रामसेवक नसून एक, एक ग्रामसेवक कडे दोन, दोन, तीन, तीन ग्रामपंचायतचे पदभार असून ग्रामपंचायतीकडे येण्यास मनमानी करत असतात. यात जनतेचे थेट पिडवनुक असते. उन्हाळा संपटताच, पावसाळा लागू झाला आहे. अति आवश्यक कागदपत्रे, काळायचे असल्यास अहेरी किव्हा आलापल्ली ला जावे लागत असते. त्यामुळे स्वतंत्र ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी.
4) राजाराम येते तलाठी कार्यालय नसून साजामध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यात यावी: राजाराम येते स्वतंत्र्य तलाठी कार्यालय नसून भाड्याचा किरायाने राहत असून या ठिकाणी जागेचा अपुऱ्या असल्यामुळे उन्हाळा पावसाळ्यात नाहक त्रास होत असून असून राजाराम सा जा मध्ये खांदला, पत्तीगाव, कोतागुडम, चिरेपल्ली, मरनेल्ली, कोंकापल्ली, सूर्यापल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी, इत्यादी गावे येत असून सा जा मध्ये कुठेही उपलब्ध करून तलाठी कार्यलय बांधकाम करण्यात यावी.
5) शासनाच्या धोरणेनुसार गाव तिथे प्रवाशी निवारा उभारण्यात यावी: राजाराम परिसरात प्रवासी निवारा नसल्याने उन्हाड्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात तीनही वृत्युत झाळाचा आसरा घ्यावी लागत असतो.
6) कमलापूर येते 33KV विद्युत केंद्र मंजूर करण्यात आले आहे. परंतु आजतगायत विद्युतचे काम सुरु करण्यात आले नाही: कमलापूर परिसरात जवळपास 30 ते 40 गावे येत असून या परिसरात नेहमीच कमी दाबाचा पुरवठा होत असतो. या अनुसंगाने महावितरण विद्युत विभागाने 33KV उद्युत मंजूर करण्यात आले आहे. परंतु आज पर्यंत सुरु करण्यात आलेले नाही. तसेच राजाराम परिसरात लाईनमेन एकच असून यांना 13 गावाचा भार आहे. विद्युत गेली की,3ते 4दिवस विद्युत येत नाही.आणि राजाराम येथील वार्ड क्र 3मधील दलित वस्तीत नवीन D P मंजूर होऊन 5ते 66महिने होत असून संबधीत अभियंता जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. दलितवस्तीत नेहमीच कमीदाबाचा पुरवठा होत असतो. अनेकदा तोंडी सांगूनही दुर्लक्ष करीत असतात. विद्युत विभागाचे रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावी.
7) अहेरी आघारातील संपूर्ण बस अहेरी, राजाराम, कमलापूर मार्ग सिरोंचा व सिरोंचा रेपनपल्ली कमलापूर राजाराम मार्ग टाकण्यात यावी: रेपणपल्ली ते गोलाकर्जी 12 किमी चा प्रवास असून मध्यस्थी एकही गाव नसून या मार्गांवर रेपणपल्ली वरून कमलापूर, कोडसेगुडम, ताटीगुडम, छल्लेवाडा, सूर्यापल्ली राजाराम, परिसरात अन्य 8 ते 10 गावे येत रायगट्टा, गोलाकर्जी इत्यादी गावे येत असतात. आणि शासकीय कामाकरीता किव्हा दवाखान्यात जायचं असतील तर, गडचिरोली किव्हा चंद्रपूर ला जायला सोयीस्कर होईल आणि प्रवासाना नाहकत्रास होणार नाही.
8) राजाराम परिसरातील विविध शाखेतील कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यात यावी: राजाराम परिसरात जिल्हा परिषद शाळा व भगवंतराव अनुदानित आश्रमशाळा असून बोटावर मोजण्याइतके शिक्षकवृद्द यांनी मुख्यालयी राहत असून उर्वरित शिक्षक अहेरी किव्हा आलापल्ली, नागेपल्ली वरून ये =जा करीत असतात.आणि आपल्या मनमाणीनुसार शाळेत येत असतात, विध्यार्थ्यांवर होणारा शैक्षणिक परिणाम व अपघाताचे परिणाम लक्षात घेऊन शिक्षकाना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे करावे. तसेच आरोग्य अधिकारी कर्मचारी,ग्रामसेवक, पटवारी, लाईनमॅन, वन अधिकारी, वनकर्मचारी, आंगणवाडी सेविका, कृषीसाह्ययक, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यात यावी, अन्यथा भत्ताकपात करण्यात यावी, तसेच चौकशी करून संबंधत्यांना कारवाई करण्यात यावी.
9) राजाराम ते कमलापूर डांबरीकरण रस्ता दुरुस्ती करण्यात यावी: राजाराम पासून अवघ्या 10किमी अंतरावर असलेल्या कमलापूर येथे या ठिकाणी आरोग्य केंद्र आणि आदिवासी विविध पतसंस्था असून आणि अन्य कामासाठी जावं म्हटलं तर रस्त्यात खड्डा की, खड्यात रस्ता या प्रकारे होऊन आहे. मात्र रस्ते बांधकाम विभागाने दुर्लक्ष करीत आहेत की काय असा सवाल वाहनधारकांना पडत आहे.
9) खांदला ते चिरेपल्ली 10 किमी चा प्रवास डांबरीकरण करण्यात यावी: अहेरी तालुक्यापासून 35 किमी अंतरावर असलेल्या राजाराम नजीक खांदला वरून पत्तीगाव, कोत्तागुडम चिरेपल्ली गावे येत असतात. स्वातंत्र्यपासून आजही या गावात जायला डांबरीकरण नाही. दर वर्षी या परिसरातील नागरिक पावसाळ्यात लोकश्रमदानातून रस्ता सुखरूप केले जाते परंतु लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असतात.
त्यामुळे या विविध समस्यांवर आपल्या परीने प्रयत्न करून त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न कराल अशी मागणी करण्यात आली.