अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ४०० खाटांच्या शासकीय रुग्णालय बांधकाम करिता १५१ कोटींचा निधी उपलब्ध झालेला असून येणाऱ्या काळात कोणत्याही रुग्णाला उपचाराकरिता बाहेरगावी जावे लागणार नाही, हे रुग्णालय अनेक पिढ्यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केला. हिंगणघाट शहरात प्रस्तावित ४०० खाटांच्या शासकीय रुग्णालय बांधकामाच्या संकल्प चित्रफीतचे येथील अनुसया सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला आरोग्य उप संचालक डॉ.कांचन वानोरे, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अंबोरे, आर्किटेक्ट सालंकर, माजी आमदार वसंत बोंडे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, राजेंद्र डागा, आयएमए अध्यक्ष डॉ. अविनाश खिळेकर यांची उपस्थिती होती. या शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाची पायाभरणी येत्या एक महिन्यात होणार असुन पुढील जून मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा संकल्प असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी यावेळी सांगितले.
शासकीय रुग्णालयाची वास्तू चारमजली राहणार असून एकूण बांधकाम हे ३ लाख ३१ हजार चौरस फूट राहणार आहे. सदर ४०० खाटांचे रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय मागील शासकिय जागेवर प्रस्तावित आहे, आरोग्य सुविधेच्या दृष्टीने या रुग्णालयाची वास्तू सर्व सुविधेने युक्त असावी याकरिता अभियंता आणि आरोग्य विभागाने परिश्रम घेतले आहे. आपण सर्व याचे साक्षीदार ठरणार आहो. ४०० बेडचे रुग्णालय बाबत नकारात्मक सर्व रिपोर्ट असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत याना सतत पाठपुरावा केला. त्यांनी विशेष बाब म्हणून ४०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाची ४०० खाटांचे रुग्णालय आवश्यक असल्याची अट आहे. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शासकीय महाविद्यालय आपल्या मतदारसंघाला मिळाले. हे माझ्या राजकीय कारकिर्तीतील सर्वात महत्त्वाचे कार्य आहे, असे आमदार समीर कुणावार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी आमदार डॉ. वसंत बोंडे म्हणाले की वैद्यकीय शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता मृतदेह लागतात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मृतदेहाची कमतरता असल्यामुळे आजही बाहेर देशातून अभ्यासक्रमासाठी मृतदेह बोलाविला जाते. हा वैद्यकीय शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असतो. माझ्या शहरात आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. ही या शहर व विधानसभा क्षेत्रासाठी फार मोठी उपलब्धी आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प जाहीर करून उपस्थितांसमोर आदर्श निर्माण केला. यावेळी संकल्प चित्रफीत द्वारे या रुग्णालयाची वास्तू आणि त्यातील सुविधांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन आकाश पोहाणे यांनी तरसंजय माडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, उद्योजक, व्यवसायी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आयोजनात आकाश पोहाणे, संजय डेहणे, अंकुश ठाकुर, संजय माडे, भुषण पिसे, विनोद विटाळे, वामणराव चंदनखेडे, सुनील डोंगरे, शुभांगी डोंगरे, सोनू पांडे, सोनू गवळी, रविला आखाडे, नलिनी सयाम, रवी रोहणकर, शारदा पटेल,भाष्कर शेंडे, प्रमोद जुमडे, गजानन राऊत, अमोल त्रिपाठी, दिनेश वर्मा, आशिष पर्बत, अमोल खंदार, भुषण आष्टणकर, मोहन तुमडाम, युवराज माऊस्कर, हर्षल गिरडकर, राजू माडेवार, महेश हिवंज, ज्ञानेश्वर भागवते, रूपेश काटकर, विक्की राऊत, तुषार येणोरकर, रवि उपासे, प्रफुल्ल क्षिरसागर, खुशाल चेले, देवा पडोळे, अनिल गहरवार, वैशाली सुरकार, विजया तेलरांधे, वंदना कामडी, राजु कामडी, गोलू काटकर, स्वप्निल सुरकार आदींनी सहकार्य केले.