प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. पण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नावावर न्हावी कारागिरांच्या फसवणूक सुरू असलेली माहिती हिंगणघाट तालुक्यातून समोर आली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या प्रशिक्षणा दरम्यान देणाऱ्या विद्यावेतन व टूलकीट च्या लाभापासून न्हावी कारागिरांची फसवणूक, व्यवसाय सुरु करण्यासाठी न्हावी समाजाच्या कारागिरांना ५% टक्के व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देणार होते. परंतु न्हावी कारागीर बँकेत गेले असता त्यांना व्याजदर १२% ते १३% सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अतूल वांदीले आक्रमक झाले आहे. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत योजनेप्रमाणे लाभ देण्याची मागणी केली. व याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले.