ऑल इंडिया स्वच्छ भारत कला स्पर्धेत कु. आस्था तेलीवार बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड ची मानकरी.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा व त्यांनी प्राविण्यासह अध्यायात ज्ञान ग्रहण करावे या हेतूने इन्फंट जीजस सोसायटी अंतर्गत इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन तथा त्यात सहभाग घेतला जातो. यातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यात ऑल इंडिया स्वच्छ भारत चित्रकला प्रतियोगिते मध्ये कु. आस्था मनोज तेलीवार ही राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक, प्रमाणपत्रासह बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड ट्रॉफी ची मानकरी ठरली तर याच स्पर्धेत ८ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. सिल्वर झोन ओलंपियाड परीक्षा आणि सायन्स ओलंपियाड झोन परीक्षा नवीदिल्ली या परीक्षेत विविध विषयाचा म्हणजे हिंदी, गणित, विज्ञान, कम्प्युटर, सामान्य ज्ञान यासारख्या अनेक विषयाचा समावेश असतो त्या परीक्षेत ४३ सुवर्णपदक, १९ सिल्वरपदक आणि १० कास्यपदक मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन आणि या परीक्षेसाठी ज्या शिक्षकांनी विशेष सहकार्य केले त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन परीक्षा प्रमुख विद्या चौधरी यांनी केले व त्यांच्या टीम मध्ये संगीता लांडे, हर्षा बरडे, मयुरी पडवेकर, मीनाक्षी अटाळकर ,नामदेव बनसोड, शोयब शेख यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या पालक वर्गांनी आपली उपस्थिती दाखविली व आपल्या पाल्यांचे अभिनंदन केले प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांनी अभिनंदन केले.

