रुग्ण उन्हात अकोला सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या दुचाकी सावलीत.
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सर्वोपचार रुग्णालय निष्क्रिय प्रशासनामुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रुग्णांला रिपोर्ट घेण्यासाठी व ११२ ओपिडी मध्ये तपासणी करण्यासाठी ओपिडी च्या बाहेर उन्हात उभे राहावे लागत होते. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक यांनी जिल्हाधिकारी तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता यांना निवेदन देऊन या रुग्णाच्या सोयीकरिता टिन शेड उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी टीन शेड उभारण्यात आले. परंतु सर्वोपचार रुग्णालयातील निष्क्रिय प्रशासनामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.
अकोला सर्वोपचार रुग्णालयातील एक्स-रे विभागामध्ये जे कंत्राटी पद्धतीने टेक्निशियन लावलेले होते त्यांना कामावरून कमी करण्यात आले आता फक्त तीन पर्मनंट कर्मचारी आहेत. त्याच्यामुळे त्या कर्मच्याऱ्यावर ताण येत आहे. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. सर्वोपचार रुग्णालयात टिन शेड हे रुग्णांसाठी उभारण्यात आले आहे परंतु या टीनशेड खाली डॉक्टर, परिचारिका, व कर्मचारी यांच्या दुचाकी मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात येतात. व रुग्णांना एक्स रे रिपोर्ट घेण्यासाठी टिन शेडच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागत आहे. यावरून रुग्णांच्या जिवा पेक्षा डॉक्टर, परिचारिका, व कर्मचारी यांच्या दुचाकी जास्त मौल्यवान आहेत असे दिसून येते.
काही दिवसांपूर्वी एका परीचारीकेने आपली दुचाकी अपघात कक्षात घेऊन जातांनीचा व्हिडिओ सोशल मिडिया वर चांगलाच वायरल झाला होता. म्हणून रुग्णांची होणारी ही गैरसोय ताबडतोब थांबविण्यात यावी व रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना टिन शेड खाली उभे राहण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.