उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्थानिक अकोट फाईल पोलीस स्टेशन समोर फलक शिक्षण अँन्ड सोशल वेलफेअर सोसायटी शिलोडा अकोला, अनंतज्योती नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिरचे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा लाभ 120 रुग्णानी घेतला या वेळी प्रख्यात नेत्रतज्ञ व रेटिना सर्जन डॉ. विक्रांत नरवाडे यांनी तपासणी केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा भाजपा, तर उद्घाटक म्हणून गजनान राठौर पोलीस उपनिरीक्षक अकोट फाईल पोलिस स्टेशन हे होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक डॉ. जीशान हुसेन अकोला महानगरपालिका, अग्निशमन दल प्रमुख हारून मनियार, कच्छी मेमन जमात अकोलाचे अध्यक्ष जावेद जकारिया, फ्लाइंग कलर्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. मुजाहिद अहमद, समाज क्रांती युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बुंदेले, सामाजिक कार्यकर्ते इस्माईल भाई टीव्हीवाले सामाजिक कार्यकर्ते शकूर खान लोदी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अशोक ओळंबे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात फलक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे कौतुक केले आहे. जावेद झकेरिया यांनी आपल्या भाषणात ज्या रुग्णांना ऑपरेशनचे पैसे परवडत नाहीत त्यांचे ऑपरेशन कच्ची मेमन जमात करणार असल्याचे सांगितले तर फ्लाईंग क्लास फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. मुजाहिद अहमद यांनी सांगितले की, जे काही खर्च केले जातात. रुग्णाच्या उपचारासाठी त्याला आमच्या संस्थेकडून मदत मिळेल. या शिबिराचे आयोजन फलक फलक शिक्षण अँन्ड सोशल वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मेहताब शाह, संस्थापक उपाध्यक्ष समीर खान नौशाद खान, संस्थापक सचिव इमरान अहमद, संस्थापक सहसचिव मो. जबी खान, संस्थापक कोषाध्यक्ष इरफान मतीन अहमद खान दुर्रानी, संस्थापक सदस्य सईद खान आणि फैजान खान यांनी केले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
हे शिबिर यशस्वीतेसाठी वरिष्ठ पत्रकार आनंद सावळे, आसिफ भाई हाडवेयर वाले, नौशाद खान पठान अशोक रामटेके, पत्रकार जमीर जे. के गजानन गोलाई, प्रभाकर वानखड़े, समीर भाई रोटी बैंक वाले, दिनेश श्रीवास्तव, मोहम्मद राशिद, सचिन बनसोडे, अमजद खान, सचिन गायकवाड़, कुणाल दारोकार आरोग्यदुत आर्गनाइजेशन, इत्यादी नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन इस्माईलभाई टीवीवाले यांनी केले. तथा आभार प्रदर्शन इमरान अहमद यानी व्यक्त केले.