प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील काही दिवसांपासून हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे हिंगणघाट पोलीस अलट मोड वर आहे. पण आजंती रिमडोह परिसरातील खर्डा कंपनीचे बाजुला असलेल्या शेतात चोरट्यांनी दिवसा ढवळ्या चोरी केली. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण हिंगणघाट पोलीसानी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या या चोरीचा गुन्हा उघडकिस आणला.
दिनांक 24 जून रोजी राजेश कोचर यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला येवुन त्यांच्या खर्डा कंपनीचे बाजुला असलेल्या शेतात धान्य ठेवण्याचे गोदाम मधुन चोरट्यांनी दोन प्लास्टीक चुगंडी मध्ये 60 किलो चन्ना किंमत 3600 रूपयाचा माल शेतातील गोदामाचे भर दिवसा शेटरवर करून चोरून नेला. अशी फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अप क्र. ८३८ /२०२४ कलम ४५४, ३८०, ३४ भादवी चा गुन्हा नोंद करून तपासात सुरू केला.
सदरचा गुन्हयाचा तपास हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथक डी. बी. पथकाकडे सोपविण्यात आला. यावेळी पोलिसांनी गोपनीय माहितीचा आधारावर सदर गुन्हयातील आरोपी नामे राहुल जर्नाधन मगरे वय 27 वर्ष रा. चिचघाट त.हिंगणघाट यास ताब्यात घेवुन त्याला सदर गुन्हयात अटक करून त्याचे घरून दोन प्लास्टीक चुंगडयामध्ये 60 किलो चन्ना जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयातील दुसरा आरोपी अक्षय भारत मेश्राम वय 29 वर्ष रा. रिमडोह त.हिंगणघाट यास ताब्यात घेवुन त्याला गुन्हयात अटक करून त्याने गुन्हयात वापरलेली हिरो कंपनीची मोटर सायकल MH 32 AM 2403 अंदाजे किंमत 30 हजार रुपये असा एकुण 33,600 रुपये किमतीचा माल जप्त करून सदर गुन्हा उघडकिस आणला.
सदरची कारवाई नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, डॉ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, रोशण पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शनाखाली हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण मुडें यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. प्रविण देशमुख, सुनिल मळणकर, पो. ना. नितीन तारांचदी, नरेंद्र आरेकर, पो.शि. विजय हारनुर यांनी केली आहे.