हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली. पण या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत वरोरा कृषी उत्पन्न बाजर समितीचे सभापती तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे आणि डॉ.आसावरी देवतळे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रशासन व संघटन विभागाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी तसे पत्र पाठविले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे आणि त्यांच्या पत्नी डॉ.आसावरी देवतळे यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी प्रदेश कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून डॉ. देवतळे दाम्पत्याला 6 वर्षांकरिता कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या पत्राची एक प्रत जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनाही पाठविण्यात आली आहे. डॉ.विजय देवतळे हे काँग्रेसचे माजी मंत्री तथा वरोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व.दादासाहेब देवतळे यांचे सुपुत्र आहेत. आता याच डॉ.देवतळे दांपत्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.