युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातीन एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयात पत्नीला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या आणि पत्नीने एक गोंडस मुलीचा जन्म दिला. पण त्याच वेळी नवजात मुलीच्या वडिलांचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनेबुधवारी (ता.२६) सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे. नितीन खुशाल ठाकरे वय 35 वर्ष रा. येसंबा यांच्या गळा चिरून दोघांनी हत्या केली आहे. जागेश्वर विठ्ठल ठाकरे वय 45 वर्ष रा. नांदगाव येसंबा, रामनगर आणि मंगेश पिलाजी शिवणकर वय 34 वर्ष येसंबा कन्हान अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.
नवजात गोंडस मुलीच्या जन्मदिनीच वडिलांची हत्या करण्यात आल्याने मुलीच्या येण्याचा आनंद साजरा करायचा की वडिलांच्या मृत्यूचा आक्रोश करायचा अशी परीस्थिती ठाकरे कुटुंबीयांची आली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पारशिवनी तालुक्यातील येसंबा येथील नितीन यांनी पत्नी दीपाली हिला नागपूर येथील डागा रुग्णालयात प्रसुतीकरिता मंगळवारी सायंकाळी दाखल केले. त्यानंतर जुनी कामठी येथील सासुरवाडीसाठी तो निघून गेला. रात्रीचे साडेसात वाजले तरी मुलगा घरी न आल्याने वडिलाने मुलाच्या मेहुण्याला फोनवरून विचारणा केली.
तेव्हा सातच्या सुमारास नितीन गेल्याचे त्याने सांगितले. नितीनला कधी दारू पिण्याची सवय असल्याने तो रात्री उशिरा यायचा. त्यामुळे रात्री उशिरा मुलगा घरी येईल, असे समजून वडील झोपी गेले. मात्र, रात्री नितीन घरीच आला नाही.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास माजी सरपंच नरेश ढोणे यांनी नितीनच्या वडिलांना त्याच्या खुनाची बातमी दिली. नितीनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बखारी ते मेहंदी रस्त्यावर पडलेला दिसला. तसेच त्याचा गळा चिरून खून झाल्याचे सांगितले. त्याच्या मृतदेहाशेजारीच एमएच ४९- ए- ७५७१ क्रमांकाची दुचाकी पडून होती. दुसरीकडे डागा रुग्णालयात नितीन पत्नीला कळा आल्या आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला. पान २ वर
मात्र, त्या गोंडस मुलीला वडिलांचा चेहरा पाहायला मिळाला नाही. खुशाल ठाकरे यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. युवकाच्या गळ्यावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पळून गेल्याचे निष्पन्न झाले. लागलीच घटनास्थळी डॉग युनिट, फॉरेंसिक पथकाला पाचारण करण्यात आले. पारशिवनी पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले. दोघांनाही ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी पोलिस तपास करीत आहे.