एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्र विकासापासून वंचित
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
एटापल्ली:- आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी नुकताच एटापल्ली तालुक्यातील विविध गावांमध्ये दौरा करून ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या जाणून घेतले. या दरम्यान त्यांनी तुमरगुंडा या गावालाही भेट दिली असता येथील नागरिकांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडत त्यांच्याशी संवाद साधले.
तुमरगुंडा येथील नागरिकांनी माजी आमदार आत्राम यांचे सोबत संवाद साधतांना रोजगारासह आरोग्य,सिंचन ,रस्ते व अन्य मूलभूत गरजांविषयी संवाद साधले. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी तुमरगुंडा येथील ग्रामस्थांना आपल्यापरीने होणारे समस्या सोडवू,अन या गावातील भिन्न भिन्न समस्यांची शासनाकडेही पाठपुरावा करू,असे शब्द दिले.
यावेळी माजी आमदार आत्राम यांच्यासोबत माजी जि.प.सदस्य व आविसचे युवा नेते संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, रमेश तोरे,विजय कुसनाके, संदीप बडगे, अजय मडावी, दिलीप मडावी, केशव गावडे पोलीस पाटील, शिवाजी वड्डे, उमेश तलांडे, गोंगुलू मटामी, सोनू गावडे, रंजित तलांडे, दोहे गावडे, ताराचंद गावडे, सुधाकर पल्लो,कन्ना गावडे, सुशील गावडे सह गावकरी व आविस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

