मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे मंजूर झालेल्या शासकीय महाविद्यालयाकरीता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनयाच्या चमुने व जिल्हाधिकारी वर्धा यांनी वैद्यकीय महाविद्यालया करीता शहरालगतच्या सर्व जागांची पाहणी करून हिंगणघाट पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील वेळा येथील ४० एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. परंतु विरोधक याच मुद्द्यावरून महाविद्यालयाच्या जागेबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत असून विरोधकांकडून विकास विरोधी राजकारण सुरू असल्याचा घाणाघाती आरोप आमदार समीर कुणावर यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमानुसार ४३० खाटांच्या रुग्णालयापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अंतर दहा किलोमीटर पेक्षा जास्त नसावे तसेच कमीत कमी २० एकर जागा असावी असे दिलेले आहे. परंतु भविष्यातील कॅन्सर रुग्णालय, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज इत्यादी विविध वैद्यकीय शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने कमीत कमी ३० ते ४० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायाच्या चमुने व जिल्हाधिकारी वर्धा यांनी वैद्यकीय महाविद्यालया करता उपजिल्हा रुग्णालया मागील जागेची पाहणी केली तसेच कोल्ही, जाम, नांदगाव, धामणगाव परिसरातील केंद्र शासनाच्या वन विभागांतर्गत येणाऱ्या झुडपी जंगलांची सुद्धा पाहणी केली. केंद्र शासनाच्या झुडपी जंगलाच्या जागेच्या परवानगीच्या प्रक्रियेसाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो तसेच उपजिल्हा रुग्णालया मागील जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणी करीता व भविष्यातील विस्तारीकरणाकरिता अपुरी पडणार आहे. ४०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता तसेच सांस्कृतिक भवन याकरीता आरक्षित असून पूरपीडितग्रस्त कुटुंबीयांना प्रत्येकी १५०० वर्ग फुटांचे पट्टे दिलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उपजिल्हा रुग्णालयामध्ये केवळ ११ एकर जागा शिल्लक आहे . ही जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणी करता अपुरी आहे.
मल कन्स्ट्रक्शनने ४० एकर जागा दिली दान. परंतु विरोधकांकडून उपजिल्हा रुग्णालयामागे ४० ते ६० एकर जागा शिल्लक असल्याचा व याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यात यावी. अशी भूमिका घेत जनतेत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता वेळा येथील सहकारी साखर कारखाना घेणाऱ्या मल कन्स्ट्रक्शनने तेथील ४० एकर जागा शासकीय महाविद्यालयाकरिता दान देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांना सादर केला आहे. ही जागा हिंगणघाट पासून चार किलोमीटर अंतरावर व रुग्णालयापासून सात किलोमीटर अंतरावर आहे.
झुडपी जंगलाच्या परवानगीसाठी दोन वर्षाचा कालावधी: केंद्र शासन अखत्यारीत झुडपी जंगलाच्या परवानगीसाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागणे अपेक्षित आहे व प्रत्यक्षात हिंगणघाट शहरात आवश्यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याने विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शासकीय महाविद्यालयाच्या जागा मंजुरीच्या दृष्टीने वेळा येथील जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी प्रस्तावित केलेली आहे, जी सर्वदृष्टीने सोयीची आहे. असे त्यांनी सरते शेवटी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, आकाश पोहाणे, भूषण पिसे, चंद्रकांत माळवे, श्याम भिमनवार, वामन चंदनखेडे, सुनील डोंगरे, विनोद विटाले, आशिष पर्वत, मुन्ना त्रिवेदी, संजय माडे, शंकर मुंजेवार , रवी उपासे आदी उपस्थित होते.