पोस्टात खाता उघडा प्रवर डाक निरीक्षक सिरोंचा उपविगीय सुभाष जावडे यांनी लाडकी बहिणीला आवाहन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- संपूर्ण महाराष्टात चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महा 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यात पोस्ट ऑफिस जवळ येऊन महिला मोठया संख्येने कागदपत्रे तयार करून बँक खाते आवश्यक असल्याने सिरोंचा पोस्ट ऑफिसमध्ये महिलांचे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी IPPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये महिला मोठ्या प्रमाणात खाते काढत आहे त्यामुळे इंडियन पोस्ट पेमेंट बँकने अशा महिलांसाठी विशेष सेवा सुरू केली. पोस्टात खाते काढण्यासाठी येणाऱ्या महिलांना त्यांना समजेल अशा भाषेत त्याचे मार्गदर्शन व सूचना केल्या जात आहे. त्यामुळे महिलांना कुठल्याही त्रासा वीणा पोस्टात खाते उघडून मिळत आहे.
राज्यात राबविले जात असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वय 21 ते 65 वयोगटातील महिलाना राज्य शासनाच्या माध्यमातून दर महा 1500 रुपये दिले जाणार आहे. या योजनेचे अंबलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, परितक्यता, निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पोस्ट कार्यालयातून खातेही उघळले जात असल्याने पोस्ट खात्यातील कर्मचारी, समिती, कलाम शेख, वाणी कोठारी, सुधाकर गडपल्लीवार, वकील चव्हाण, बादेश, अल्ताब शेख, अंजल तल्ला व प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक यांनी जास्तीत जास्त पोस्ट खात्यातील IPPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) खाता उघळून महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहेत.