मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाटः- तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय परिसरात व्हावे म्हणून शासकीय वैद्यकीय संघर्ष समितीने आंदोलन केले. त्यात हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांनी पत्रकार परिषदेत वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा येथेच होणार असे जाहीर करून हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी संपूर्ण हिंगणघाट तालुक्यात वातावरण तापले असताना महाराष्ट्र संदेश न्युजने एक खळबळजनक माहिती समोर आणली होती. हिंगणघाट येथे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाकरीता मल कन्स्ट्रक्शनने वेळा येथील 40 एकर जागा दान दिलेल्या प्रस्ताव सदर केला. त्या जागे संदर्भात मोठा खुलासा महाराष्ट्र संदेश न्युज ने केला होता. त्यामुळे वेळा जागेसाठी हट्ट करणाऱ्या लोकांचे पितळ उघडे पडले आहे.
वेळा या गावात जवळपास 180 एकर परिसरात स्व. बापुरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना हा मल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नागपूर तर्फे अजय दाऊदयाल मल यांनी खरेदी केली. त्यात सात बारा 7/12 मध्ये मल कन्स्ट्रक्शन कंपनीने फेरफार न करताच जागा दान देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केला. आणि त्या जागे संदर्भात कुठलीही शहनिशा न करता तो मंजुरी करण्यासाठी वर पाठविण्यात आला. या वरून असे दिसून येते की वर्धा जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेऊन हे सर्व करण्यात आले. कारण मल कन्स्ट्रक्शन ने जागा दान देनाच्या प्रस्ताव आधी पाठवला आणि फेरफार 14 जून 2024 ला करण्यात आला. आणि त्या जागेवर शासन आणि बँकेचा कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा बोजा चढलेला आहे.
मल कन्स्ट्रक्शन ने 180 एकर जागे पैकी 40 एकर जागा ही हिंगणघाट येथे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाकरीता 1 रुपयात दान देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात विरोध सुरू असताना आमदार समीर कुणावर यांनी पण वेळा येथेच वैद्यकीय महाविद्यालय होणार अशा हट्ट धरलाय. पण मल कन्स्ट्रक्शनच्या या जागेवर कोट्यवधीचे कर्ज असून शासन आणि अनेक बँकेचा बोजा चढून असल्याची माहिती सात बारा 7/12 च्या उताऱ्यावरून समोर आली आहे. त्यामुळे आवळा देऊन कोवळा काढायचा तर मल कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा अट्टाहास केला नसेल ना?.
मल कन्स्ट्रक्शन कंपनीवर कोट्यवधीचा बोजा.
मल कन्स्ट्रक्शन कंपनीवर सहकारी सोसायटी को-ऑप बँकचा 15,40,00000 कोटी रुपये, असिस्टंन कमिश्नर ऑ सेल्स टॅक्स विभागाचा 2,61,83,270 कोटी रुपये, शासनाचे शासकीय अर्थ सहाय्य विभाग 2074.13 लाख, मा. तहसीलदार हिंगणघाट दिनांक 24/4/2018 पत्रानुसार 1420, मा. तहसीलदार हिंगणघाट यांचे पत्र क्र./मह. सहा./ववान/कावि 760 / 2021 दिनांक 15/7/ 2021 विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था (साखर) वर्धा 28/06/2021 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 155 अन्वये शासकीय बोजा रुपये 36.35 लाख रुपये बोजा असून ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यासाठी मल कन्स्ट्रक्शन कंपनी का बर राजी झाली ते सर्व यात लपून आहे.
शासनाचा आणि इतर बँकेचा या जागेवर कोट्यवधीचा बोजा चढलेला आहे. त्यापासून बचावण्यासाठी मल कन्स्ट्रक्शन या कंपनीने वेळ साधून हा कार्यक्रम केला असे संपूर्ण हिंगणघाट तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात आमदार समीर कुणावर यांनी या जागेचा पत्रकार परिषदेत मोठा आग्रह केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथील मल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जागेवर होणार असे जाहीर केल्याने त्यांच्या भूमिकेवर आज मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.