मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामधील श्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एस एस एम विद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थीवर इथेच शिक्षण घेत असलेल्या एका दुसऱ्या विद्यार्थिने बाहेरील गुंड मुलांची गँग आणून हमला केला. त्यामुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शाळा कॉलेज हे चांगले मनुष्य बनण्याचे मुख्य साधन आहे. शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थित छोटे मोठे भांडण आपण बघितले असेल पण हिंगणघाट शहरातील श्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयात दि. 9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याच शाळेत शिकणारा दुसरा विध्यार्थीने बाहेरील 7 ते 8 गुंड प्रवृत्तीच्या मुले आणून एका विद्यार्थ्यांवर हल्ला केला. ही मारामारी सुरू असताना एका मुलीने आपल्या कमरे मधून धारधार चाकू काढत त्या विद्यार्थ्यांवर हल्ला करत असताना त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी समय सूचकता दाखवत विद्यार्थाला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि तात्काळ 112 वर पोलिसांना फोन लावला.
आरोपी व पीडित एकाच शाळेतील विद्यार्थी: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामधील श्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थी आणि पीडित विद्यार्थीही याच विद्यालयात शिकतात. जखमी विद्यार्थी आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काही कारणावरुन वाद सुरु होता. यातूनच आरोपी विद्यार्थिने पीडित विद्यार्थ्यांना धमकावत हल्ला केला.
शहरात वाढत आहे बाल गुन्हेगारी.. मागील काही वर्षांपासून हिंगणघाट शहरात बाल गुन्हेगारी सह दारू अमली पदार्थांचे व्यसनात तरुणाई झिंगत आहे. त्यात शाळा कॉलेज मध्ये अशा भयंकर घटना घडत आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातील प्रामाणिक प्रयत्न करून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आज दहशतीत वावरत आहे असे चित्र यावेळी शाळा परिसरातून दिसून येत होते.