अहेरी विधानसभा निवडणुकी मध्ये कांँग्रेसच्या माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांना उमेदवार तिकीट द्या
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात गडचिरोली जिल्हातील आदिवासी बहुल विधानसभा मतदार संघ काँगेस आपल्या पाल्यात आणण्यात कुठलीही कसर ठेवणार नाही असे आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पडोळे आणि गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे उपजिल्हा अध्यक्ष मुश्ताक हकीम यांची निवडणुकी संदर्भात भेट घेत सांगितले.
2024 मध्ये होण्याऱ्या विधानसभा निवडणुक लवकरच होणार आहे. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कांँग्रेस अजित पवार गट वेगळा झालेला आहे, आणि नुसताच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये अहेरी विधानसभा मतदार संघातुन कांँग्रेस उमेदवाराला बिजेपी उमेदवारा पेक्षा जास्त मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा मतदार संघ कांँग्रेससाठी अनुकुल ठरत आहे.
महाविकास आघाडी मध्ये हा क्षेञ राष्ट्रवादी कांँग्रेस (शरद पवार गट) कडे होता. परंतु आमदार धर्मरावबाबा आञाम हे अजित पवार बरोबर गेल्याने महाविकास आघाडीत हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहावं लागेल. हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार यांच्या कडून काँगेसच्या पदरात पाडून घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अहेरी क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षापासुन कांँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ, निष्ठावंत आहेत ज्यानी महाराष्ट्रात कांँग्रेस पक्ष सत्तेत असो किवा नसो कांँग्रेस पक्ष सोडलेला नाही व जेव्हा सम्पुर्ण भारतात कांँग्रेस ची परिस्थिती अत्यंत कठीण होती तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो याञा आणि न्याय याञा काढली तेव्हाही या क्षेञातुन कांँग्रेसचे कार्यकर्ते हे या क्षेञातील कांँग्रेसचे नेते माजी आमदार पेन्टांरामा तलांडी यांच्या नेतृत्वात त्या कांँग्रेस कार्यकर्ते सोबत सामील झाले होते.
तरी 69-अहेरी विधानसभा हा क्षेञ कांँग्रेसच्या कोट्यात आला तर या क्षेञातुन कांँग्रेसचे निष्ठावंत नेते आहे. जे विधानसभा निवडणुक लढण्यास ईच्छुक आहे. अशा निष्ठावंत नेत्यालाच उमेदवारी देण्यात यावी. 2024 लोकसभा निवडणुकीत कांँग्रेस पक्षाचे विर्दभात खासदार जास्त निवडुण आले आहे व पुढे ही महाराष्ट्रात कांँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. हे पाहुन काही नेते वेळेवर कांँग्रेस पक्षात प्रवेश करुन तिकिट मिळण्यास ईच्छुक आहे. तरी आपण या सम्पुर्ण गोष्टींचा विचार करुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत कांँग्रेस कार्यकर्यावर अन्याय होणार नाही व त्याचा भावणा दुखावणार नाही या सम्पुर्ण गोष्टींचा विचार करुन अहेरी विधानसभेचे मध्ये उमेदवार द्याल अशी अहेरी विधानसभा मतदार संघातील कांँग्रेस कार्यकर्त्याची मागणी जोर धरत आहेत हे मात्र निश्चित.