निसर्गफेरी, क्षेत्रभेट, कचरा व्यवस्थापन, ई कचरा संकलन, ऊर्जा व पाण्याची बचत, प्लास्टिक वापर टाळणे, गांडूळ खत निर्मिती आदींचे आयोजन.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 9 जुलै:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे समग्र शिक्षा अंतर्गत शाळेतील इको क्लब ही एक योजना असून या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्यस्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरण संरक्षना करिता अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींचे आयोजन करण्यात आले.
इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम वर आधारित आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, निसर्ग फेरीकाढून राजुरा जोगापूर वन पर्यटन केंद्राला क्षेत्रभेट देण्यात आली, यावेळी वृक्ष लागवड, ओला सुका कचरा व्यवस्थापन, ई कचरा संकलन करून नगर परिषदेच्या स्वाधीन केले, स्वच्छता जनजागृती केली, जुन्या टाकाऊ कपड्यांच्या पिशव्या तयार केल्या, शोष खड्डा, गांडूळ खत, परसबाग आदींची निर्मिती केली, प्लास्टिक चा वापर टाळणे बाबत प्रतिज्ञा घेतली, पाण्याची बचत करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा बचत करणे, शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे आदींवर प्रत्यक्ष कृती व मार्गदर्शन, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार यांनी सर्व उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, जयश्री धोटे, रुपेश चिडे, सुनीता कोरडे,अर्चना मारोटकर, नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, विकास बावणे, वैशाली चिमुरकर, मनीषा खामनकर, पूजा बावणे, अंजली कोंगरे, रणदिवे, आदीं शिक्षकांचे सहकार्य लाभले. उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हरित सेना इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. सुरेश येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) वनविभाग राजुरा, शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.