सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे येथील नामवंत कॉलेजच्या बिल्डिंग उडी मारून विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडली. बारावीचे शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करीत होती.
कॉलेज मध्ये आत्महत्येचे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षण संस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्याचे ही समोर आले आहे.
शनिवारी चंद्रपूर शहरातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या सोमय्या कॉलेज व पॉलिटेक्निक येथील बारावीत शिकणारी विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करीत होती. तिने कॉलेजच्या बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर उपचारासाठी नेण्यात आले.
नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना झाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिक सोमय्या कॉलेजात दाखल झालेत. या घटनेला प्राचार्यांना जबाबदार ठरवून शिवसैनिकांनी मारहाण केली अशी सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली.
गंभीर जखमी विद्यार्थिनीला नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र मुलीची प्रकृती गंभीर आहे. अजून मुलीचे बयान नोंदविता आले नाही. यामुळं अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.