मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत सरकार संचलित स्वामी विवेकानंद रिसर्च नॅशनल पूर्णवास ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेत हिंगणघाट येथील डॉ. नेहा प्रदीप आर्य या विद्यार्थिनीने संपूर्ण देशात 9वा क्रमांक पटकावला आहे. डॉ. नेहा प्रदीप आर्य यांनी प्राप्त केलेल्या नयनदीपक यशामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
डॉ. नेहा आर्य यांनी सावंगी येथील रवी नायर फिजिओथेरपी महाविद्यालयातून फिजिओथेरपीचा अभ्यास पूर्ण केला असून, त्यांनी अखिल भारतीय परीक्षेत 9 वा क्रमांक मिळाल्यानंतर देशातील कोणत्याही राष्ट्रीय विद्यापीठात डॉ. नेहा आर्य पुढे पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकेल. या परीक्षेत भारतात 9 वा क्रमांक पटकावल्याबद्दल तिचे सर्व शिक्षक आणि कुटुंबीयांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.