राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्य विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज (12 जुलै) मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवार मैदानात असल्याने या निवडणुकीत चुरस चांगलीच वाढली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात एक महत्वपूर्ण माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे 4 आमदार फुटणार आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या निवडणुकीत समोरा समोर आहे त्यात ठाकरे गटाने आपल्या आमदारांना मुंबईतील 4 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं नाही. त्यात महा युती ने पण आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे.
यातच काल काँग्रेस आमदाराची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसचा कोटा संपल्यानंतर उर्वरित मते शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला देण्यात यावे, असं आवाहन काँग्रेस आमदारांना केला आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार या बैठकीला काँग्रेसचे दोन आमदार गैरहजर होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. माहितीनुसार झिशन सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर या बैठकीला गैरहजर होते.
आमचे चार आमदार फुटणार: आज माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमचे चार आमदार फुटणार असल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकाचा बाप राष्ट्रवादीत गेला आहे. एका महिला आमदाराचा नवरा राष्ट्रवादीत आहे. एक टोपीवाला इकडे-तिकडे असतो. तर चौथा नांदेडवाला आहे, अशा शब्दात गोरंट्याल यांनी वर्णन केले आहे.
झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर जितेश अंतापुकर हे भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. भाजपने अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधील काही मतांची तजबीज करायला सांगितले आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन आमदारांबाबत काँग्रेसची शंका आणि चिंता वाढली आहे.