मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ग्रामिण भागातील विद्यार्थांना भारत विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पायपीट करून यावे लागत होते. बसस्थानक ते भारत विद्यालय निशुल्क बस सेवेमुळे विद्यार्थी व पालक सुखावले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील 400 विद्यार्थ्याना सोईचे झाले आहे.
समाजात आपलाही पाल्य हा उत्तम नागरीक व्हा आपल्याही मुलाला मुलीली उत्तम शिक्षण मिळावे या करिता ग्रामिण भागातील पालक शहरातील भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय, हिंगणघाट संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील अतिशय सन्मानाने ख्याती प्राप्त शाळेत प्रवेश मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतात परंतु ही शाळा विद्यालयाच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे अनेक ग्रामिण भागातील पालकाना जरी ग्रामिण भागातून बस नी शाळेत आले तरी बसस्थानक किवा सरकारी दवाखाना चौक ते भारत विद्यालय हे दोन किमी अंतर पायपीट करित यावे लागत असे करिता पालक प्रवेश घेताना ही समस्या वारंवार बोलायेच यावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्यामभाऊ भीमनवार, सचिव रमेशराव धारकर यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक राजूजी कारवटकर यानी विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता ग्रामिण भागातून वर्ग 5 ते 8 मधिल 400 विद्यार्थ्याकरिता निशुल्क खाजगी बस सेवा सुरू केली असुन सदर बस ही सकाळी 7.15 व 7.30 वाजता बसस्थानक परीसरातुन विद्यार्थ्याना भारत विद्यालया परीसरात आणने पोहचविणे करित आहे.
या बसचा शुभारंग दिनाक 01 जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर यांच हस्ते करण्यात आला. ही बससेवा निशुल्क राहणार असुन ही नियमित सुरू राहणार असल्याचे मुख्याध्यापक कारवटकर यानी सांगितले आहे. या बसफेरी मुळे ग्रामिण भागीतील ज्या विद्यार्थानी भारत विद्यालयात प्रवेश घेतला त्याना आता पायदळ यावे लागणार नाही. बस सेवेमुळे विद्यार्थी, पालकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यालया तर्फे अधिक उपाययोजना तयार केले जाणार आहे.

