मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हा साठी मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे म्हणून हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती सर्व पक्षीय नेते, महिला समिती, आम्ही सावित्रीच्या लेकी संघटना सह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी हिंगणघाट पासून तर मुंबई पर्यंत विविध प्रकारची आंदोलने केली. नागरिकांचा वाढता दबाव, हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेज नाही दिलं तर सत्ताधारी आमदाराची सीट गेली असं माहिती होताच सत्ताधारी स्थानिक आमदार आणि राज्य सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हायला मंजुरी दिली.
वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हायला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार समीर कुणावर आणि भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी वेळा गावातील मल कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या कोट्यावधीचा बोजा असलेल्या खाजगी जागेचा अट्टाहास सुरू केला. आमदार समीर कुणावर यांनी तर पत्रकार परिषद घेऊन हिंगणघाट शासकीय वैद्यकीय कॉलेज वेळा येथेच होणार असे जाहीर केले. त्यानंतर तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले. त्यात आज कुणी एक एकर जागा कुणाला दान देत नाही तर मल कन्स्ट्रक्शन ने चक्क 40 एकर जागा सरकारला दान देण्याची तयारी दर्शवली पण त्यांचा हेतू काय होता हे नागरिकांना न सुटलेले कोडे आहे?. त्यात आमदार समीर कुणावर, स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती, सर्व पक्षीय नेते, महिला समिती यांच्यावर आगपातळ करत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय कॉलेज हे वेळा येथील खाजगी जागेवर होणार हा अट्टाहास केल्याने संपूर्ण हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत होता.
स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे अध्यक्ष पेशाने शिक्षक असलेल्या अध्यक्षावर पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करत लांशन लावण्याचा प्रयत्न केला. पण भाजपा कार्यकर्त्यांचा कुठलाही हतकंडा काम आला नाही. त्यामुळे कावळ्याच्या उलट्या बोंबा असेच चित्र दिसून आले.
त्यात मुंबई येतील राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वेळा ते हिंगणघाट अंतरावरून खोटी माहिती दिल्याचे समोर आल्याने नागरिकांचा संशय अजून बळावला या बाबत “दाल मे कुछ काला है, या पुरी दाल ही काली है” अशी चर्चा रंगली.
हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती सर्व पक्षीय नेते, महिला समिती, आम्ही सावित्रीच्या लेकी संघटना सह विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी मेडिकल कॉलेजकरिता केलेल्या आंदोलनातून याची प्रचिती पूर्ण जिल्ह्याला तसेच सरकारला सुद्धा आलेली आहे. त्यावेळी सत्तपक्षाचे आमदार तसेच त्याचे पक्षीय कार्यकर्ते जे आज वेळ्याबद्दल खूपच आग्रही आहे. ते मात्र या आंदोलनापासून अलित्प होते आणि आजही ते शासकीय जागेचा आग्रह सोडून एका खाजगी जागेचा, ज्यावर कोट्यावधी रूप्याचा बोजा आहे. त्याकरिता आग्रह करीत आहे. त्यामुळेच जनतेच्या मनात कुठेतरी शंका उत्पंन होत आहे. तेव्हा ही शंका दूर करावयाची झाल्यास वेळा येथील खाजगी जागेचा आग्रह सोडून, शासकीय जागेवर हिंगणघाट शहरात किंवा शहराला लागूनच असलेल्या जागेवर मेडिकल कॉलेज होण्याचा मार्ग प्रशस्त करावयास हवा. ही सर्व सामान्य जनतेची मागणी आहे. आमदार समीर कुणावर ह्यांनी विचार करायला हवा. ज्या हिंगणघाट शहरातील लोकांनी १० महिने आंदोलन केलं त्या शहरावर अन्याय होऊ देणार का सत्ताधारी लोकप्रतिनिधी? हा मोठा प्रश्न आहे सर्व हिंगणघाट वासियांना पडला आहे.