अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महावितरण ने संपूर्ण राज्यात सदर बिलात मागील एप्रिल 24 पासून प्रचंड प्रमाणात भाववाढ केलेली असून ही दरवाढ सर्वसामान्य जनतेचे कंबर मोडणारी आहे. सदर दरवाढ त्वरित मागे घेण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे विधानसभा प्रभारी प्रवीण उपासे यांनी आज तहसीलदार हिंगणघाट यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
या संदर्भात हिंगणघाट येथील काँग्रेस नेते प्रवीण उपासे यांनी निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, महावितरण ने मागील एप्रिल महिन्या पासून वीज युनिटच्या दरात बेसुमार वाढ केलेली आहे.
1)100 युनिट पर्यंत 43 %
2)101-300 युनिट पर्यंत 40 %
3)301 ते 500 पर्यंत 40 %
4)500 युनिट च्या वर 40 %
अशी बेसुमार भाववाढ केल्याने गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेचे जीवन जगणे कठीण झालेले आहे. या जळणाऱ्या युनिट शिवाय स्थिर आकार (मीटर भाडे), वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, ह्या विविध हेड खाली आकारण्यात आलेले शुल्क हे कशासाठी? या जनतेच्या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. त्याच प्रमाणे जीथे वीज निर्मिती होते तेथून ग्राहकांच्या घरा पर्यंत आणण्यात येते त्यावर लावण्यात येणारा वहन कर ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे जनतेला युनिट प्रमाणे प्रचंड दर आकारण्यात येत असतांना वहन कराच्या रूपाने पुन्हा बिलातून वसुली लूट नव्हे काय? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या अन्यायकारक व तुघलकी प्रकाराने सामान्य जनतेची लूट होत आहे. याबाबत शासनाने ह्या अफाट भाववाढी बाबत समर्पक खुलासा करावा अन्यथा या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सर्वश्री शालिकराव डेहने, चंदाताई येलेकर, गीताताई मेश्राम, प्रमोद महाजन, सुरेश गायकवाड, अनुराग तिमांडे, भीमराव मून, कुंदन खडसे, कुणाल बोभाटे, प्रथम शेनाड, अरविंद चौधरी उपस्थित होते.

