हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपुर:- पोलीस दलातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बल्लारपूर येथे एका पोलीस शिपायाने आत्महत्या करून आपल जीवन संपवलं आहे. पोलिसांनी आत्महत्या केल्याने कर्मचारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपुरातील पोलीस शिपायाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस वसाहतीत एका कर्मचाऱ्याने जीवन संपवलं आहे. मृत पोलिसाचे नाव अजय मोहूर्ले आहेत. बल्लारपूर पोलीस स्थानकात शिपाई पदावर कार्यरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी मृत्यदेहाचा पंचनामा करून पोलीस शिपायाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मृतक पोलिस अजय पांडुरंग मोहुर्ले हे वस्ती विभागातील क्वार्टरमध्ये राहत होते. मागील काही दिवसापासून त्यांचा पत्नीसोबत वाद होत होता. मागील पाच सहा दिवसांपासून त्यांची पत्नी नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी राहत्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक अजय मोहुर्ले याला एक सात वर्षाचा मुलगा आहे.
सोमवारी त्यांचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे (रा. चंद्रपूर) हे अजय ला भेटण्यासाठी आले असता त्यांना दार आतून बंद दिसले. कानोसा घेतला असता त्यांना दुर्गंध आल्याने त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वाटरचा लोकांना सांगितले. तसेच पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. अजय यांनी आत्महत्या दोन दिवसापूर्वी केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.