गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती. फकिरवाडी गावातील नागरिकांनी प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्याकडे रस्ताची व पाण्याची समस्या निकाली काढण्याची केली मागणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जाम सर्कल मधील फकीरवाडी या गावातील नागरिकांना रस्त्याच्या व पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात शिरताच रस्तास दिसेनासे होत आहे. अशातच येथील जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची भेट घेतली आणि सर्व आपबिती सांगितली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आज फकिरवाडी येथे जाऊन येथील लोकांचा समस्या जाणून घेतल्या या गावात थोडासा जरी पाऊस आला की लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून रस्ता पूर्ण बंद होऊन जातो. गावातील एकादी व्यक्ती आजारी पडला कि, त्याला रस्त्यांने जाता येत नाही. तसेच रस्त्याचा कडेले नाली सुद्धा नाही, रस्ता हा रस्ताच आहे की सांडपाणी वाहण्याची जागा इतकी बिकट परिस्थिती या गावातील नागरिकांची झाली आहे.
फकिरवाडी गावातील लोकांची मूळ समस्या आहे ती, गावात एकही रस्ता नाही, गावातील नागरिक विद्यमान आमदार यांच्या कडे गेले असता आमदार लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले असे गावातील नागरिकांनी सांगितले.
गावातील नागरिकांना पट्टे वाटप झाले असून गावात रस्ता, नळ, बोअरवेलची व्यवस्था नाही. गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील रस्ता ९५/५ च्या अंतर्गत मंजूर झाला असून त्यांच्या प्रस्ताव सुद्धा पास झाला आहे. परंतु रस्ता अजून पर्यंत झालेला नाही.
याकडे मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी मध्यस्थी कडून या रस्त्याच्या प्रश्न मार्ग लावावा अशी मागणी गावातील नागरिकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कडे केली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सरपंच लता कुडमेथे, उपसरपंच अभिलाष गिरडकर, माजी उपसरपंच अजय खेडेकर, पिंटू कुडमेथे, प्रितम भिवनकर, प्रमोद चौखे, माधव भाईमारे, पवन भुते, सचिन डाहाके,नसिर शेख,शाहिद शेख, अमन शेख, आरिफ शेख, फिरोज शेख आदी उपस्थित होते.