महाराष्ट्र संदेश न्युजचा दणका परतूर शहरातील गेली दहा ते बारा वर्षांपासून परकुटा गल्ली नाल्या आणि रस्त्यापासून वंचित होती महाराष्ट्र संदेश न्युज मध्ये बातमी प्रकाशित होताच परकुटा गल्लीतील नाल्या आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शहरातील परकुटा गल्लीतील नागरिकांचे म्हणणे असे की परकुटा गल्लीत नाल्या आणि रस्ते 2009 पासून ते 2024 पर्यंत काम केले नसल्यामुळे नागरिकांचे हाल सध्या पावसाळा सुरू आहे आणि नाल्यांचे काम केले नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येते आणि रस्ता व्यवस्थित नाही रस्त्यावरचे पाणी नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यातच साठून राहते त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येते शाळेचा ऑटो रिक्षा सुद्धा गल्लीत येत नाही म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते आणि मुले शिक्षणा पासून वंचित राहत आहेत.
गल्लीतील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असून नगर पालिका प्रशासन नगरसेवक किंवा नगराध्यक्ष फक्त निवडणुका आल्यावर मत घेण्यापूर्ते आमच्या गल्लीत येतात आणि मतदान झाल्यावर पुन्हा कधीच आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत नाहीत अशी महाराष्ट्र संदेश न्युजच्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्यावर शासनाने तात्काळ परकुटा गल्लीतील नाल्या आणि रस्त्याच्या कामाला केली सुरुवात