अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गिमाटेक्स वणी युनिट येथिल भास्कर मानकर पिप्रटरी टिव्ही या विभागात कामगार म्हणून काम करत होते, काही कारणास्त त्यांचा दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुदैवी मृत्यू झाला. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार समिर कुणावार, भाजपा कामगार संघटनेचे नेते मिलिंद देशपांडे यांच्या निर्देशानुसार गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर यांचे कडे पाठपुरावा करून मृत कामगाराच्या परीवाराला आर्थिक मदत देण्याचा लेखी प्रस्ताव पत्र दिला.
यावेळी कंपनी व्यवस्थापन तसेच संघटनेच्या कराराप्रमाणे सर्व कामगारांच्या वेतनातून प्रती कामगार १०० रूपये कपात करून एकुन १ लाख ४२ हजार ६०० रूपयांचा धनादेश दिवंगत भास्कर मानकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी सर्वश्री पांडुरंग बालपांडे दिवाकर बरबटकर, दामोदर देशमुख, जिवन भानसे, प्रशात शेळके, राकेश तराळे, जयंत बावणे, हेमंत भगत, श्रावण थुटे, विनोद कावळे, मनोज जुमडे, लक्ष्मण जयपुरकर, राहुल देशमुख, विनोद कोल्हे, विजय थुल इत्यादि उपस्थित होते.

