हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात अधूनमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ 4-5 दिवस येत नाहीत. अनेकदा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरातील मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे आम आदमी पक्षापुढे मांडले. यानंतर आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आप शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेण्याची वेळ मागितली पण त्या वेळेत ते नगरपरिषदेत उपस्थित नव्हते त्यांच्या अनुपस्थितीत नगरपरिषद कर्मचारी संगीता उमरे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक परिसरात बोरवेल ची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, मनिषा अकोले, ज्योती तोडेकर,प्रज्ञा पिपरे, ज्योती टोडेकर , वृंदा पिपरे, बबिता नगराळे, पौर्णिमा दुबे, सुनीता बंगले, दर्शना कुळसंगे ,अर्चना काळे, बुजाळेताई, दामिनी, सिंधुबाई राधाबाई डोंगरे, शोभाबाई मोरे, पौर्णिमा पाटील व इत्यादी उपस्थित होते.