मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासणाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापण दिना निमित्य संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधी दरम्यान शालेय शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिनांक 22 जुलै ला भारत विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमातून “शिक्षण सप्ताह” ला सुरवात करण्यात आली. या शिक्षण सप्ताहाचे उदघाटन उपमुख्याध्यापक हरीश भट्टड याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले, विनोद नांदुरकर उपस्थित होते.
आजच्या प्रथम दिवसी अध्ययन अध्यापन साहिज्य दिना निमित्य विविध खेळ, शब्द पटटया, वाचन कटटा, पर्यावरण, पाणी वाचवा, बाहुली व कटपुतली कार्य, ल्युडो, बौधिक खेळ यांचे आयोजन पहील्या दिवसी करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक राजु कारवटकर यांच्या मार्गदर्शनात श्रावण कुडमेथी, मिलिंद सावरकर, अर्चना सुमपाम, अंजु काकडे, राजश्री तांबोळी, हर्षा भुतडा, श्रीमती नांदेडकर, पवन लोहकरे, यानी विद्यार्थ्यामार्फत विविध साहित्य व खेळ घेतले तर श्रावण कुडमेथी यानी वाचन कटा हा उपक्रम घेतला या करिता अर्चना सुरपाम व ग्रंथपाल विकास नागरकर यानी पुस्तके उपलब्ध करून दिली.