मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट:- नुकत्याच पार पडलेल्या जून २०२४ च्या महाराष्ट्र शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्राकरीता १८७.२८ कोटी रूपयांच्या भरघोस कामांना महाराष्ट्र शासनाने मंजूरी दिली असून यामध्ये प्रामुख्याने हिंगणघाट येथील ४०० खाटांच्या रुग्णालयाच्या मुख्य इमारती चे बांधकाम करण्यासाठी रूपये १५१.१० कोटी, हिंगणघाट व समुद्रपूर तहसील कार्यालयाचे फर्निचरची कामे करण्यासाठी रूपये ८.१८ कोटी, पारडी (नगाजी) व पिपरी (जांगोणा) गावा जवळील पुलांची बांधकामे रूपये ४.५० कोटी, हिंगणघाट ते येणोरा गावच्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी रूपये ३.५० कोटी, खापरी गावातील सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी रूपये ००.८० कोटी, पारडी -टेंभा रस्त्यांवरील पुल बांधकाम करीता टेंभा गावांचे वळण मार्गाला भुसंपादन करणे रूपये ०.५० कोटी,
समुद्रपूर तालुक्यातील सेवाग्राम- मांडगाव- शेडगाव रस्त्याचे शेडगाव जवळील पुलाचे बांधकाम करण्यासाठी रूपये ४० कोटी, समुद्रपूर बायपास रोडची सुधारणा करणे रूपये १.७० कोटी तसेच जाम-नंदोरी रस्त्याचे जाम येथील चौकाचे रूंदीकरण व सुधारणा करणे साठी रूपये १० कोटी इत्यादी कामांचा समावेश असून या सर्व कामांना निधी उपलब्ध झाला असून लवकरच सदर कामे कार्यान्वित होणार आहे.