हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर दि.21:- ला भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा, शहर, ग्राम शाखा तर्फे चलो बुध्द की ओर या योजने अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकांचे आयोजन त्रिपिटक बुध्द विहार रमाबाई वॉर्ड राजुरा, इंदिरा नगर वार्ड राजुरा, सुविकास बुध्द विहार गोयेगाव, सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा, ” येथे भारतीय बोैद्ध महासभा, तालुक्याचा वतीने 2022 नंतर 2023 आणि 2024 मध्ये “वर्षावास धम्मप्रवचन ” मालिकाकेला सुरवात करण्यात आली.
वर्षावास धम्मप्रवचन ही मालिका आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत राबविण्यात येत आहे. त्रिपिटक बुद्ध विहार रमाबाई वॉर्ड राजुरा येथील कार्यक्रमाचे भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका अध्यक्ष धर्मुजी नगराळे राजुरा यांचा हस्ते तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रजलन करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या “वर्षावास धम्म प्रवचन व गुरुपौर्णिमा” या विषयावर अतिशय सुंदर सविस्तर पणे भीमराव खोब्रागडे उपाध्यक्ष, विठ्ठल बक्षी सर समता सैनिक दल, विनोद निमसरकर, धर्मुजी नगराळे या प्रत्येकानी मार्गदर्शन केले.
तर दुसरीकडे इंदिरा नगर राजुरा येथील बुद्ध विहारात मार्गदर्शक प्रणाली ताकसांडे, मेघा बोरकर, रत्नमाला मावलीकर यांनी मागदर्शन केले, सुविकास बुध्द विहार गोयेगाव येथे पुरुषोत्तम वनकर, राजहंस पीपरे यांनी मार्गदर्शन केले. सोमनाथपुर वॉर्ड राजुरा येते गौतम देवगडे, किरण खैरे, वंदना देवगडे, राजुरा तालुक्यामध्ये राजुरा बामणवाडा, गोयेगावं येथील सर्व पदाधिकारी बौद्ध उपासक व उपासीका उपस्थित होते.
या ठिकाणी बुध्द भूमी राजुरा, रमाबाई वार्ड राजुरा, इंदिरा नगर राजुरा, सोमनाथपुर वॉर्ड राजुरा, चुनाभट्टी वॉर्ड राजुरा, रामपूर, बामणवाडा, गोयेगावं या ठिकाणी वर्षावास ची प्रवचन मालिका घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन गौतम देवगडे तर आभार प्रदर्शन गौतम चौरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.