शवगृहातील बंद असलेल्या फ्रीजर मुळे मृत्यूदेहाची होत आहे विटंबना, सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अमरावती विभागात सर्वात मोठे रुग्णालय म्हणून अकोला सर्वोपचार रुग्णालय आहे. परंतु या रुग्णालयात निष्क्रीय प्रशासनामुळे रुग्णांना जिवंतपणी व मरणा नंतर ही नरकयातना भोगाव्या लागत आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, शवगृह येथील फ्रीझर बंद असल्याने मृतदेह कुजण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
अकोला सर्वोपचार रुग्णालय येथील शवागारातील फ्रीझर बाबत सांगायचे तर, मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे फ्रीझर बंद आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही अनोळखी मृतदेहाकडे दुर्लक्ष होत असून, जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळल्यास आणि उपचारा दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हे मृतदेह पोलीस प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात येतात. या सर्वोपचार रुग्णालयातील शवगृहात मृत्यूदेह ठेवण्याची सुविधा आहे. परंतु काही दिवसापासून हे शव गृहातील फ्रिजर बंद असल्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सर्वोपचार रुग्णालयामधील पोस्टमार्टम रूम मधले दोन्ही फ्रिज बंद झाल्यामुळे मृतदेह हे ॲनाटोमी मध्ये पाठवल्या जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना भरपूर त्रास होत आहे. संध्याकाळी किंवा रात्री डेड बॉडी घेऊन आणल्यास ती अनाटोमी मध्ये ठेवावी लागते व सकाळी ती बॉडी अनाटोमी मधून काढून पीएम रूममध्ये घेऊन जा लागते यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना बराच त्रास सहन करावा लागतो. यामुळे या मृत्युदेहाची अवहेलना व विटंबना होत आहे.
पीएम रूम मधले फ्रिज तीन महिन्यापासून बंद पडलेले आहेत. मृतदेहाची अवहेलना व विटंबना होत आहे हे बंद पडलेले फ्रीजर सुरू करून मुत्यृदेहाची अवहेलना व विटंबनेस जबाबदार असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन छेडु याची नोंद घ्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.