मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समिती (सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट) ह्यांनी रविवारी 21 जुलै रोजी 400 बेड रुग्णालयाचे बांधकाम विधानसभा निवडणूकी पूर्वी सुरू करण्यात यावे आणि लवकर महाविद्यालयासाठी जागा निश्चित यावी ह्यासाठी आंदोलन पुकारले होते. सोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला संघर्ष समितीच्या महिला ह्यांचा आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. एक प्रमुख वळण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची यांची माजी आमदार राजू तीमांडे ह्यांनी भेट घेत 24 जुलै रोजी हिंगणघाट येथे जागेची पाहणी करण्याचे आश्वासन घेतले.
हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विषय दिवसेंदिवस तापत आहे. आंदोलनाचा 228 वा दिवस म्हणून रविवारला पावसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथे कृती समितीच्या महिलांनी लवकरात लवकर जागा निश्चित करून ४०० बेड रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात यावे ह्यासाठी निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनात सीमा मेश्राम, निर्मला भोंगाडे, सिंधू दखणे, जयश्री देवगडे, सुषमा पाटील, वैशाली वासेकर उपस्थित होत्या.
महिलांचे अन्न त्याग आंदोलन सुरू. उपोषणकर्त्या महिला सुजाता जीवनकर, सुजाता जांभूळकर, सुनीता तामगाडगे आणि इतर सहकारी महिलांचे मुख्य मागणी शासकीय महाविद्यालयाची जागा उपजिल्हा रुग्णालय लगतच निश्चित करण्यात यावी ही आहे. सोबतच खासदार अमर काळे ह्यांनी मागील आठवड्यात आपल्या आश्वासनप्रमाणे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जागेचा प्रश्न लवकर सोडवावा असे मत व्यक्त केले.
ह्या सर्व घटनाक्रमात एक आणखी महत्वाचे पाऊल म्हणजे माजी आमदार राजू तीमांडे ह्यांनी तातडीने जिल्हाधिकारी ह्यांची 22 जुलै रोज सोमवार का भेट घेत 24 तारखेला हिंगणघाट येथे जागा पाहणीकरिता येण्याचे निवेदन केले. त्यावर राहुल कर्डिले यांनी नाजूक परिस्तिथीचा आढावा घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या आजूबाजूला खरंच 40 एकर जागा आहे की 9 एकर जागा आहे ह्याची पडताळणी करण्याचे ठरवले.
मागील आठवड्यात महसूल अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालया परिसरात फक्त 9 एकर जागा उपलब्ध आहे असा चुकीचा अहवाल पाठवला गेला अशी तक्रार हसन मुश्रीफ ह्यांच्याकडे झाली होती. त्याचे पडसाद म्हणून स्वतः जिल्हाधिकारी आता रिंगणात उतरणार असे दिसते. जिल्हाधिकारी ह्याची भेट घेताना माजी आमदार राजू तीमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, सुरेंद्र बोरकर, पडवे सर, संदेश मुन उपस्थित होते.

