संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्री गुरूदेव सेवा मंडळ सहकार नगर यांच्या वतीने हनुमान मंदिर सहकार नगर इथे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नियमित होणारी सर्वधर्म सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे उपतालुका प्रमुख ग्रामगीताचार्य मारोती सातपुते यांनी निःस्वार्थ भावनेने सेवा मंडळाचे कार्य केले तरच कार्य टिकते अन्यथा ते खंडित झाल्याशिवाय राहत नाही असे विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी लटारु मत्ते उप तालुका सेवाधिकारी यांनी परीक्षेचे जीवनातील महत्त्व विषद करून प्रत्येकानी ही परीक्षा देऊन महाराजांचे विचार आत्मसात करावे असे आव्हान केले, तर मोहनदास मेश्राम, तालुका प्रमुख (ग्रा.जी.वी.प) यांनी ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचा उद्देश काय आहे आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य व विचारातून निर्मळ, निःस्वार्थ, सेवाभावी वृत्तीनी, निष्काम भावनेनी काम करणारी माणसं निर्माण झाली पाहिजेत तरच सेवा मंडळाचे कार्य पुढील पिढीस प्रेरणादायी ठरेल असा विचार व्यक्त केला, राजेंद्र मालेकर यांनी परीक्षेची स्वरूप व महत्त्व सांगितले, शैलेश कावळे संघटक यांची प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी प्रमूख पाहुण्याच्या हस्ते उपस्थित परिक्षार्थ्याना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले व पुढील परिक्षेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षेचे केंद्रप्रमुख देविदास वांढरे यांनी केले तर उत्तम सूत्रसंचालन अश्विनी वांढरे यांनी केले. या कार्यक्रमाला सहकार नगर येथील उपासक अनिल चौधरी, गजानन बोढे, उत्यमराव अवघडे, रामप्रसाद बुटले, गोपाळ बुरांडे, परशुराम साळवे, आत्माराम शेंडे, नामदेव लांडे, एकनाथ कार्लेकर, दिलीप ताकसांडे, सुरेंद्र लांडे, गणेश कुडे, नंदकिशोर नांदे, पवणकर , शौर्य मेश्राम, माधुरी बटले, सरोजिनी हिवरे, नलिनी लांडे, प्रियंका कोकोंडावार, सारिका मोहितकर, अरुणा चौधरी, पार्वता मोहितकर, उज्वला धोबे, मंदा रासेकर, मंदा पोराटे, तानेबाई आस्वले, मंगला पेटकर , सुवर्णा कावळे, नलिनी मेश्राम , काव्या वांढरे, केतकी कावळे, अवंती चोखारे, प्रणाली देवाळकर इ. मोठ्या संख्येने गुरूदेव उपासक उपस्थिती होते. राष्ट्रवंदना घेउन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.