अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नागपूर ताजबाग शरीफ येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 102 वा वार्षिक उर्स 29 जुलै पासून सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वाकी दरबार ट्रस्ट येथुन वार्षिक उर्स निमित्त 30 जुलैला शाही संदल काढण्यात येत आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या दरबारात प्रत्येक धर्माचे आणि पंथाचे लोक येऊन भक्तिभावाने वंदन करतात. अशा स्थितीत बाबांचा दरबार हा शहरवासीयांसाठी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ठरत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात उर्सच्या निमित्ताने राज्यातील हिंदू आणि मुस्लिमांसह स्थानिक लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात.
30 जुलैला वाकी दरबार येथून शाही संदल निघून छोटा ताजबाग (सक्करदरा) स्थित अन्नक्षेत्र येथे 12.30 वाजता पोहोचेल. तेथे कव्वाली व महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन तेथून शाही संदल दुपारी 2.00 वाजता ताजबाग शरीफ कडे निघेल. संदल दरबार मध्ये पोहचल्यानंतर भक्ती भावाने हजरत बाबा ताजुद्दीन औलिया याना चादर फुल, अत्तर अर्पण करून सर्व भक्तांसाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल.
तरी आपण सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने या शाही संदल मध्ये उपस्थित राहून बाबांचा आशीर्वाद घ्यावा. असे आव्हान ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जादा नशिन श्री. प्रभाकरजी डाहाके पाटील यांनी केले आहे.