चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
चोपडा:- माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली चोपडा काँग्रेस कडून तहसील कार्यालय चोपडा येथे नायब तहसीलदार सचिन बांबळे यांना निवेदन देण्यात आले.
चोपडा तालुक्यात नुकताच काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे सोयाबीन,कापूस,मका, मूग,उडीद असे अनेक पिकांच नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
पिक पेरा लावण्याची पद्धतीत बदल करावा शेतकऱ्यांना पीक पेरा लावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे जसे की काही ठिकाणी नेटवर्क साठी अडचणी, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत अश्या अनेक अडचणी येत आहेत तरी पिक पेरा नोंदणी ही शासकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील, शहराध्यक्ष काँग्रेस के.डी. चौधरी सर, मधुकर आबा, धनंजय पाटील, अशोक साळुंखे, प्रदेश सचिव एन.एस.यू.आय. चेतन बाविस्कर, किसान सेल अध्यक्ष चोपडा शशिकांत साळुंखे, परिवहन सेल अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र देवकांत चौधरी, संदीप बोरसे, एस.डी.पाटील, नंदलाल शिंदे, कांतीलाल पाटील, भागवतराव बोरसे, संदीप बोरसे, सुनील बोरसे, योगेश पाटील, एस.आर.ओ एन.एस.यू.आय. घनश्याम पाटील, गोपाल नायदे, राहुल पाटील, समाधान कविरे, कुणाल पारधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.