Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 21,410 शेतकर्‍यांना 2 कोटी 91 लाख रुपयांची मदत: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 20, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 21,410 शेतकर्‍यांना 2 कोटी 91 लाख रुपयांची मदत:   मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

लोणी:- या वर्षी राज्यात आणि जिल्हात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी संकटात आले. त्यामुळे शासनाने मदत करावी म्हणून अनेक शेतकरी आशेवर होते.

जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसानत झालेल्या 172 गावांमधील 21,410 शेतकर्‍यांना 2 कोटी 91 लाख रुपयांच्या मदतीचा दिलासा राज्य सरकारने दिल्याची माहिती महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अ.नगर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, संगमनेर, अकोले, अ. नगर, राहुरी, कोपरगाव, राहाता या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.

यामुळे 172 गावांमधील सुमारे 1 हजार 319 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेती पिकांचे महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते. झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. त्यानुसार ही मदत जाहीर झाल्याचे ना. विखे म्हणाले. जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जामखेड तालुक्यातील 2 गावांमधील 62 शेतकर्‍यांना 1 लाख 46 हजार 315 रुपये, श्रीगोंदा तालुक्यात 45 शेतकर्‍यांना 3 लाख 22 हजार 830रु., शेवगाव तालुक्यात 23 शेतकर्‍यांना 1 लाख 43 हजार 100 रुपये तर संगमनेर तालुक्यात 314 शेतकर्‍यांना 29 लाख 69 हजार 730 रुपये मदत जाहीर झाली आहे.

जुलै महिन्यात अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत 112 गावांत शेतीक्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये 19 हजार 319 शेतकर्‍यांना 58 लाख 31 हजार 293 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात राहुरी, कोपरगाव आणि राहाता या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली. यामध्ये राहुरी तालुक्यातील 409 शेतकर्‍यांना 60 लाख 89 हजार 280 रुपये तर कोपरगाव तालुक्यातील 1171 शेतकर्‍यांना 1 कोटी 31 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. राहाता तालुक्यातील 64 शेतकर्‍यांना 4 लाख 62 हजार रुपयांच्या मदतीचा दिलासा राज्य सरकारने दिला आहे.

शेतकर्‍यांच्या खात्यात निधी जमा करणार..!
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 हजार 500 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. सप्टेंबर महिन्यात ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची ग्वाही दिली होती. जाहीर झालेली मदत लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याचे ना. विखे पा. यांनी सांगितले.

Previous Post

चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा चोपडा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन.

Next Post

राहुरी: पोलिस स्टेशन मध्येच दोन महिलांनी पेट्रोल अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न, दोन महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राहुरी: पोलिस स्टेशन मध्येच दोन महिलांनी पेट्रोल अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न, दोन महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल.

राहुरी: पोलिस स्टेशन मध्येच दोन महिलांनी पेट्रोल अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न, दोन महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In