मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहर हे भारत देशाच्या मध्यभागी वसलेले आहे. औद्योगिक व व्यावसायिक दृष्ट्या अतिशय प्रगत पण शिक्षण क्षेत्राविषयी कमालीची अनास्था असलेल वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं शहर आहे. मात्र उच्च शिक्षणाच्या संधी शोधण्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागते सरकारने जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असाव अशी घोषणा केली. जिल्हा लगत दोन मेडिकल कॉलेज असल्यामुळे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता ते हिंगणघाट शहरांमध्ये व्हाव यासाठी सर्व हिंगणघाटवासी एकवटले आणि मेडिकल संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या सर्वाची आर्त हाक शासनापर्यंत पोहचवविण्याचे कार्य मेडिकल संघर्ष समितीच्या वतीने सुरू झाले हिंगणघाट मधील युवक, महिला, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, इंजिनिअर, डॉक्टर, वकील, सामान्य नागरिक, सेवाभावी संस्था व सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून राजकीय नेत्यांनी देखील यात सहभाग घेतला आणि मेडिकल संघर्ष समितीच्या माध्यमातून मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. यावेळी शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीने तब्बल २०८ दिवस आपले अविरत आंदोलन सुरू ठेवले अनेक गोष्टीसाठी आंदोलन झाली असेल पण आरोग्य व शिक्षणासाठी २०८ दिवस आंदोलन करणे हा एक विक्रम संघर्ष समितीने केला.
माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा आहेच पण त्यात आता शिक्षण व आरोग्य याचा सुद्धा समावेश झालेला आहे कारण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आणि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे म्हणून आतापर्यत सुस्तावलेला हिंगणघाटकर शिक्षण व आरोग्यासाठी पेटून उठला हिंगणघाट ते आझाद मैदान मुंबई इथपर्यत आंदोलने झाली याचे पडसाद सत्ताधारी पक्षावर पडले व ते सुद्धा मेडिकल कॉलेज साठी पुढे सरसावले व सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आले हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेज मंजूर झाले त्या दिवशी हिंगणघाट मध्ये दिवाळी साजरी झाली सर्व हिंगणघाटकर आनंदाने न्हाऊन निघाले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही त्या आनंदावर विरजन पडले आणि हिंगणघाटला मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रस्ताव शासनाने वेळा येथील खाजगी जागेचा पाठविला. त्यामुळे परत आंदोलन पेटले.
मेडिकल कॉलेज हिंगणघाटलाच झाले पाहीजे ही मागणी हिंगणघाट करांची होती त्यासाठी संघर्ष ही हिंगणघाट मध्ये झाला पण मेडिकलचा कॉलेजचा प्रस्ताव वेळा येथील खासगी जागेचा पाठविण्यात आला हे सर्व अनाकलनीय होते अचानक कोणी इथे यावं आणि कर्णासारखं उदार होऊन दान करावं हे न समजण्या इतकी हिंगणघाटची जनता दूधपिती नव्हती केवळ काही मातब्बर गर्भश्रीमंत लोकांनी येणाऱ्या आपल्या पिढ्यान पिढ्या आयतं बसून खाईल एवढी अमाप संपत्ती जमा करण्याच्या दृष्टीने खासगी जागेचा प्रस्ताव पाठवावा आणि शासनाने सुद्धा याच जागेची मंजूरीसाठी शिफारस करावी यासारखं दुसरं दुर्दैव तरी काय असावं?
हिंगणघाट मधील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे की शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे मेडिकल कॉलेज व्हावे कारण इथे जर कॉलेज झाले तर स्थानिक लोकांना छोटे मोठे व्यवसाय सुरू करता येईल स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळेल सर्वांच्या हाताला काम व खर्चाला दाम मिळेल हिंगणघाट मधील व परिसरातील जनतेला आरोग्य सुविधा मिळेल त्यांना उपचारासाठी सावंगी, सेवाग्राम व नागपूर येथे जावे लागणार नाही. मुलांचे मेडिकल व मेडिकल क्षेत्रांशी निगडीत सर्व शिक्षण घरबसल्या होईल हिंगणघाट वासीयांचा रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात दूर होईल. इथला सामान्य नागरिक संपन्न होईल आणि हिंगणघाट शहराच्या वैभवामध्ये मध्ये भर पडेल म्हणून हिंगणघाट मधली सर्वसामान्य जनतेची तळमळ आहे की, हिंगणघाट शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयामागेच मेडिकल कॉलेज व्हावे कारण लोकांनी यामध्ये जीव ओतून सहभाग घेतला आंदोलने केली, उषोषणे केली, लढा दिला याची प्रशासनाने दखल घ्यावी व सर्व राजकीय नेत्यांनी आपलं राजकारण बाजूला ठेवून हिंगणघाटच्या विकासासाठी सर्वजण एकत्रित येऊन प्रयत्न करावा व शासनाने हिंगणघाटमधील सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी अधिक न खेळता जागेचा तिढा लवकरात लवकर सोडवावा व हिंगणघाट मध्येच उपजिल्हा रुग्णालया मागे मेडिकल कॉलेज कराव. या अपेक्षेसह.