विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जारावंडी:- जारावंडी पेंढरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र जारावंडी पेंढरी परिसरातील काही गावे बनली आहे. काही दिवसांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश आहे.
जारावंडी पेंढरी परिसर आदिवासी बहुल असून याचा फायदा गो तस्कर घेत आहेत, अश्याने जनावरांचे नामशेष होणाच्या मार्गावर आहेत.
आज शेती करतांना यांत्रिक उपकरणाचा वापर वाढला असला तरी जारावंडी परिसरात बहुतांश शेतकरी बैल रेडा यांच्या साहाय्याने शेती करतात, त्यामुळे पशुधनाचे महत्व आजही कायम आहे. परिसरात जनावरांचे योग्य रीतीने सांभाळ केला जातो, त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे नेमकी ही बाब लक्षात घेऊन गो तस्करांनी जारावंडी पेंढरी येथे गो तस्करीचा अड्डा बनवून जनावरांना कत्तलखान्यात पाठवल्या जात आहे.
जारावंडी पेंढरी परिसरातील काही गावांमध्ये जंगलात शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते. जारावंडी पेंढरी परिसरातील गावांतून आणि छत्तीसगड वरून जनावरे आणली जातात.रस्त्याने जनावरांची दर दिवसा मोठ्या ट्रक ने वाहतूक भरधाव वेगानेकेली जाते. वाहनांमध्ये जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबली जातात. त्यामुळे काही जनावरांचा तडफडून मृत्यू होतो.
जारावंडी पेंढरी परिसरातील गावातून व छत्तीसगड वरून जारावंडी पेंढरी परिसरातील काही गावांमध्ये आणले जातात. तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात. यात आंध्रप्रदेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातील येथील दलाल जारावंडी पेंढरी येथे भाड्याने रूम घेऊन राहत असल्याचे दिसते विशेष म्हणजे पोलीस स्टेशन जारावंडी आणि परिसरातील गावामध्ये हे सर्व प्रकारसुरू आहे यात जारावंडी येथे वन उपज तपासणी नाका आहे आणि स्त्यालगत सी सी टीव्ही कॅमेरे आहेत आणि जारावंडी, पेंढरी, गटा, कारखाफा, पोटेगाव चामोर्शी गडचिरोली समोर चंद्रपूर मार्गाने वाहतूक केली जात आहे. या मार्गावर शेकडो पोलीस स्टेशन आणि वन नाके येतात परंतु आज पर्यंत कोणतेच कारवाही झालेली नाही तरी या गौतस्करीला आळा घालण्यात यावा अशी मागणी गोवंशप्रेमींकडून मागणी केल्या जात आहे.