उषाताई कांबळे, प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी आझाद समाज पार्टी महिला मोर्चाच्या महिला अध्यक्ष नेहा शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक उपनगर पोलीस ठाणे येथे विविध विषयाला अनुसरून निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित महिला मोर्चाच्या महिला संगीता निकम, महाराष्ट्र संघटक माधुरी आहेरे, नाशिक शहर अध्यक्षा मनीषा पवार, नाशिक जिल्हा संघटक उपाध्यक्ष पल्लवी पगारे, नाशिक जिल्हा संघटक सुनिता पवार, नाशिक शहर अध्यक्षा जया पवार कार्यकर्ता ह्या वेळेस उपस्थित होते.
आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिला पोलीस उपस्थित होत्या. आज राज्यात समाजामध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असून त्यात महिला समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार घटना वाढल्या आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षित राहण्यासाठी महिला समितीच्या वतीने नाशिक उपनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन अशा काही घटना घडलेल्या असून त्या होता कामा नये अशी खबरदारीचे उपायोजना करावे असे निवेदनात म्हटले आहे.
राज्यात मागील काही काळात अशा काही घटना घडलेल्या असून 28 जून 2024 रोजी लातूर कस्तुरबा वस्तीगृहातील सायली गायकवाड यांचा मृत्यू प्रकरण. 6 जुलै रोजी अक्षदा म्हात्रे बेलापूर नवी मुंबई शिळफाटा येथे गणेश घळ मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने महिलेची सोबत बलात्कार करून महिलेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला. 27 जुलै रोजी उरण येथे राहणाऱ्या 22 वर्षीय जयश्री शिंदे हिचे अतिशय विकृतपणे शरीराचे अवयव कापून हत्या करण्यात आली. 1 ऑगस्ट रोजी मुंबई शिवडा येथे पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तीस वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. महाराष्ट्रातील वर्षभरात एकानंतर एक अशी अनेक गंभीर गुन्हे घडत आहे. म्हणून प्रत्यक्षात निषेध नोंदवण्यासाठी माणसाला लाज वाटणाऱ्या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या एका मागून एक घडलेल्या घटना हे दर्शविले की दिवसाने दिवस विकृतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे ते नियंत्रना असावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.