संतोष मेश्राम,राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2024 -25 शिक्षण विभाग पंचायत समिती राजुरा द्वारा मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाच्या काही उप विषयाचे नाट्यीकरण सादरीकरणासाठी विषय दिले होते. ही स्पर्धा यादवराव कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विविध शाळेंनी सहभाग दाखविला त्यामधून इन्फंट शाळेच्या सीबीएसई शाखेतील वर्ग 7 व 8 वा वर्गातील विद्यार्थ्यांनी एआयई (A1)आणि समाज या उप विषयावर नाट्यींकरणाचे सादरीकरण केले व त्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
इन्फंट शाळेच्या या संघात आरिष शेख, विधान बानकर, मनश्री गोणेलवार, हर्षदा डाहुले, अंशुल ताजणे, प्रतिज्ञा चौधरी, स्वीकृती राठोड या विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यांना सुषमा साळवे, अश्विनी फासला, संगीता पथाडे व श्रीनिवास आरेवार या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्याच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे संस्थेचे संचालक अभिजीत धोटे , पंचायत समिती शिक्षण विभाग मधील अधिकारी, सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा संजय अलोने, स्टेट शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय नाटयीकरण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.