माजी आमदार प्रा.राजू तिमांडे तसेच कृ.उ.बा. समितीचे सभापती ऍड. सुधीर कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न.
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आगामी येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची समुद्रपूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा. राजू तिमांडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. सुधीर कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांचे सुद्धा म्हणणे ऐकून घेतले.
यावेळी माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांनी बैठकीला संबोधित करते वेळी म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून आपण पक्षासाठी व जनतेसाठी कार्य करत आहोत. प्रत्येक गाव खेड्यात आजही आपला कार्यकर्ता खंबीरपणे आपल्या सोबत उभा आहे. येणाऱ्या विधानसभेची संपूर्ण तयारी आपली झाली असून आपण संपूर्ण ताकतीने, कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवून विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त करत कामाला लागण्याचे आदेश दिले. व येत्या १० ऑगस्ट २०२४ रोजी महावीर भवन हिंगणघाट येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान त्यावेळी माजी आमदार प्रा. राजु तिमांडे सह ऍड.सुधिर कोठारी यांनी केले. त्यावेळी मोठ्या संख्येने पदादिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.